घरमनोरंजननवरात्रीत येणार 'लवरात्री'

नवरात्रीत येणार ‘लवरात्री’

Subscribe

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला चित्रपट 'लवरात्री' ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे.

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिला चित्रपट ‘लवरात्री’ ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. सलमान खान फिल्म्स बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

नवरात्रीमध्ये होणार चित्रपट प्रदर्शित

नवरात्रीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. गुजरातच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. नवरात्रीसारख्या सणामध्ये चालू होणाऱ्या प्रेमकथासंबंधी हा चित्रपट असून सलमान खानने याच्या टीझरला आवाज दिला आहे.

- Advertisement -

अन्य कलाकारांच्या ट्विट करून शुभेच्छा

‘या, प्रेमाचा अनुभव घ्या.’ असं ट्विट करत सलमान खाननं टीझर प्रदर्शित केला. त्यानंतर टीझर रिलीज झाल्यानंतर बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रिटीजनी आयुष शर्माला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तर करण जोहरनं ट्विट करत आयुष शर्माचं चित्रपट क्षेत्रामध्ये स्वागत केलं आहे. ‘आयुष आणि वारिना चित्रपटात खूपच सुंदर दिसत आहात. अजून नव्या गाण्यांची नक्कीच वाट पाहू.’ अशा मनःपूर्वक शुभेच्छा रितेश देशमुखनं आयुष आणि वारीनाला नव्या चित्रपटासाठी दिल्या आहेत. हा चित्रपट नेहमीच आपल्या मनाच्या जवळ राहील अशा भावना व्यक्त करून आयुष शर्मानं आपल्या ट्विटर हँडलवरून ‘लवरात्री’चं टीझर ट्विट केलं.

दिग्दर्शकापासून सगळेच नवीन

नवा दिग्दर्शक अभिराज मिनावाला यानं चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटामध्ये राम कपूर आणि रोनित रॉयच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. ५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -