घरमनोरंजनसंजय जाधवचा 'लकी' येतोय ७ डिसेंबरला!

संजय जाधवचा ‘लकी’ येतोय ७ डिसेंबरला!

Subscribe

संजय जाधव आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

दिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ते लवकरच ‘लकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ या दोन संस्था  या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

चित्रपटाबद्दल उस्तुकता

‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘गुरू’, ‘येरे येरे पैसा’ अशा सुपरहिट चित्रपटानंतर संजय जाधव यांच्या ‘लकी’ चित्रपटाबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटाची कथा काय असेल, त्यात कोण कोण कलाकार असतील या प्रश्नांच्या उत्तरासाठी मात्र प्रेक्षकांना काही काळ वाट पहावी लागेल. सिनेमाविषयी बोलताना संजय जाधव यांनी सांगितले की, ‘सध्या आमचे संहितेवर काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सिनेमाच्या स्टारकास्टचा विचार आम्ही करू. सध्या सिनेमाविषयी जास्त बोलता येणार नाही’.

- Advertisement -

बी लाइव्हचा पहिलाच सिनेमा

म्युझिक आणि इव्हेंट्स क्षेत्रातील नावाजलेली कंपनी ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ ‘लकी’ सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या संदर्भात ‘बी लाइव्ह प्रोडक्शन’चे संचालक आणि ‘लकी’ सिनेमाचे निर्माते सुरज सिंग यांनी सांगितले की, ‘आमच्या निर्मितीसंस्थेची मराठी चित्रपट निर्मितीत उतरण्याची बऱ्याच काळापासून इच्छा होती. संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे फिल्ममेकर आहेत. त्यांच्यासोबत आमच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती करताना आम्हांला आनंद होत आहे’.

चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

संजय जाधव यांची खासियत आहे की, ते आपल्या सिनेमाच्या घोषणेच्यावेळीच त्याच्या रिलीजची डेटही दरवेळी जाहीर करतात. त्याप्रमाणे त्यांनी लकी चित्रपट ७ डिसेंबर २०१८ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -