घरमनोरंजनफॅन्सची इच्छा झाली पुर्ण;रणबीर दीपिका आले एकत्र!

फॅन्सची इच्छा झाली पुर्ण;रणबीर दीपिका आले एकत्र!

Subscribe

रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाल्यानंतर त्या दोघांप्रमाणेच फॅन्सलाही फार वाईटले होते. मात्र ब्रेकअपनंतरही हे दोघं तमाशा, ये जवानी हे दिवानी या दोन्ही चित्रपटात या दोघांच्या कामाचे खूप कौतूक झाले. मात्र या चित्रपटानंतर हे दोघे पुन्हा कधी एकत्र दिसले नाही. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र कधी दिसणार याची चाहते आतुरतने वाट बघत होते. अखेर चाहत्यांची इच्छा पुर्ण होणार आहे. कारण लवकरच लव रंजनच्या चित्रपटात रणबीर आणि दीपिका एकत्र झळकणार आहेत.

- Advertisement -

लव रंजन रणबीर आणि अजय देवगण यांना घेऊन एक चित्रपट बनवणार होता. मात्र काही कारणास्तव अजय देवगणने या चित्रपटातून काढता पाय घेतला. मात्र आता लव रंजनने देखील हा चित्रपट सोडून दुसऱ्या एखा चित्रपटावर काम सुरू केलं आहे. या चित्रपटासाठी त्याने रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोणला कास्ट केलं आहे. लव ने आधीच या दोघांच्या डेट्स फिक्स केल्या आहेत. त्यामुळे तुमची लाडकी जोडी पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर धम्माल करणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

चित्रीकरणा आधीच लव ने या दोघांना या चित्रीपटाची स्टोरी ऐकवली आहे. आणि या दोघांना ही स्टोरी आवडली देखील. मध्यंतरी लव रंजनच्या ऑफिसबाहेर रणबीर आणि दीपिकाला स्पॉट केल होतं. मात्र चाहत्याांनी लव रंजन बरोबर सिनेमा करू नकोस असा सल्ला दीपिकाला दिला होता. कारण लव रंजनवर एका अभिनेत्रीने मी टू चा आरोप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -