घरमनोरंजनगुलजार आणि पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

गुलजार आणि पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Subscribe

प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार आणि चित्रपट निर्माते कवी गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीसुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे. 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोन जणांची निवड झाली आहे.

नुकत्याच ज्ञानपीठ निवड समितीकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ज्ञानपीठ 2023 पुरस्कार दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.” यापूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील प्रसिद्ध लेखक दामोदर मौजो यांना सन्मानित करण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोण आहेत गुलजार?

गुलजार यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या गझल कवितांमधून आणि गाण्यांमधून गुलजार यांनी नावलौकिकता मिळवली आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. गुलजार यांच्या शेरोशायरी तर जगभर प्रसिद्ध आहेत. गुलजार यांनी साहित्य क्षेत्रात देखील मोठे योगदान दिल्यामुळे त्यांना अनेक नामांकित पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोण आहेत जगद्गुरू रामभद्राचार्य?

जन्म झाल्यावर दोन महिन्यांत जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी दृष्टी गमावली होती. रामभद्राचार्य यांना 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. याचबरोबर 250 पेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्यांना 22 भाषांचे ज्ञान आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना भारत सरकारने 2015 ध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. रामभद्राचार्य हे चित्रकूट येथील ‘तुलसीपीठ’चे संस्थापक आहेत. त्यांनी अपंगांसाठी एक विद्यापीठ आणि शाळा देखील सुरू केली आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. संस्कृत भाषा, वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक म्हणूनच रामभद्राचार्य यांची ओळख आहे.

काय आहे ज्ञानपीठ पुरस्कार?

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टतर्फे भारतीय साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा १९६५ मध्ये मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांना ओडक्कुझल या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला ११ लाख रुपये, मानपत्र आणि वाग्देवीची कांस्य मूर्ती देण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -