Made In Heaven 2: 2019 मध्ये प्रदर्शित झालेली वेब सीरिज ‘मेड इन हेवन’ ही प्रेक्षकांच्या पसंदीस पडली होती. या सीरिजचे सीजन सुपरहिट झालेच पण त्याला एम्मी अवॉर्डसाठी सुद्धा नॉमिनेशन मिळाले होते. तेव्हापासून प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीजनची वाट पाहत होतो आणि आता त्याचा दुसरा सीजन प्रदर्शित करण्यात आला आहे. अशातच बीआर आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी शो मधील राधिका आपटे हिच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
या वेबसीरिजला संमिश्र प्रतिक्रिया दिली गेली आहे. शो चे काही सीन्स हे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. कारण लोक सीरिजच्या दुसऱ्या सीजनचे सात विविध एपिसोड पाहत आहेत. पाचव्या एपिसोड हा फारच इंट्रेस्टिंग आहे. त्यात राधिका आपटेने पल्लवी नावाच्या एका दलित नववधूची भूमिका साकारली आहे.
अशातच दलित नेते आणि बीआर आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी या एपिसोड आणि दलित चरित्राच्या चित्रिकरणाचे कौतुक केले आहे. निर्देशक नीरज घेवान यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच, प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँन्डलवर एपिसोडचे दोन फोटो शेअर केले. पुढे असे लिहिले की, मला महिलेच्या रुपातील पल्लवीची भुमिका फार आवडली. तुम्ही सर्व वंचितांनी ही सीरिज पहावी तेव्हाच तुम्हाला आपल्या ओळखीचा दावा करु शकता आणि राजकीय प्रमुखता मिळेल. (Made In Heaven 2)
सीरिजचे निर्देशक नीरज घेवान यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी असे म्हटले की, हेच सर्वकाही आहे, खुप आभार सर. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.
एक्सेल मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी द्वारे निर्मित ‘मेड इन हेवन सीजन-2’ अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि जोया अख्तर द्वारे निर्मित आणि दिग्दर्शित करण्यात आली आहे.
हेही वाचा- रजनीकांतच्या Jailer सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पार केला 400 कोटींचा आकडा