Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माधुरी दिक्षीत अन् उर्मिलाचा मातोंडकरचा ठसकेबाज डान्स पाहिलात का?

माधुरी दिक्षीत अन् उर्मिलाचा मातोंडकरचा ठसकेबाज डान्स पाहिलात का?

दोघींना लावलेल्या ठुमक्यांवर प्रेक्षक घायाळ झाले आहेत.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत (Maduri Dixit) सध्या सोशल मीडियावर प्रंचड सक्रिय असते. माधुरी दिक्षीत बॉलिवूडची डान्सिंग क्विन आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधुरीच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ भलताच पसंत पडला आहे. मात्र या व्हिडिओत केवळ माधुरीच नाही तर तिच्यासोबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar) देखील दिसत आहे. माधुरी दिक्षीत आणि उर्मिला मातोंडकर एका रिअॅलटी शोदरम्यान एकत्र आल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

माधुरी आणि उर्मिलाने ‘मुझे प्यार हुआ अल्लामिया’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. उर्मिलाच्या सिनेमातील या गाण्यावर दोघींनी दमदार ठेका धरल्याचे पहायला मिळाले. दोघींना लावलेल्या ठुमक्यांवर प्रेक्षक घायाळ झाले आहेत. सध्या दोघींच्या व्हिडिओला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  ‘डान्स दिवाने ३’ या हिंदी कार्यक्रमात उर्मिलाने पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी माधुरी आणि उर्मिलाने गाण्यावर ठेका धरत धम्माकेदार डान्स सादर केला.

गेल्या अनेक दिवसांपासून डान्स दिवाने हा कार्यक्रम माधुरी जज करत आहे. सेटवरील माधुरीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. माधुरी दिक्षीतच्या या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थिती लावत असतात.


- Advertisement -

हेही वाचा – सायरा बानो यांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र एंजिओग्राफी करण्यास नकार!

- Advertisement -