घरमनोरंजनMadhuri Dixit : प्रेमिका गाण्यावर माधुरीचे ठुमके

Madhuri Dixit : प्रेमिका गाण्यावर माधुरीचे ठुमके

Subscribe

अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 च्या दशकात तर ‘धकधक गर्ल’ने बॉलिवूडवर अधिराज्य केले. आजही माधुरीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, तिची एक झलक पाहण्यासाठी ते उत्सुक असतात. गेल्या काही वर्षात माधुरी इन्स्टाग्रामवर विशेष सक्रिय झालेली पाहायला मिळाली. ती जवळपास दररोज विविध ट्रेंडिंग रील्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुक सगळ्या समाजमाध्यमांवर सध्या एकच गाणं व्हायरल होतंय ते म्हणजेच “प्रेमिका…” 1994 मध्ये हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. प्रभुदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नगमा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. परंतु, आता पुन्हा एकदा रील्समुळे हे गाणं चर्चेत आलं आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर प्रेमिका या प्रभुदेवाच्या लोकप्रिय गाण्याची चर्चा रंगली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही या गाण्यावर रील्स बनवण्याचा मोह आवरत नाहीये. अगदी बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील या गाण्यावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. “प्रेमिकाने प्यार से…” या गाण्यावर माधुरीने खास बॉलीवूड स्टाईलने डान्स केला आहे. हिरव्या रंगाच्या भरजरी ड्रेसमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे. माधुरीच्या या रील्स व्हिडीओचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 नेटकरी या व्हिडीओवर “रिअल ट्रेन्ड विनर”, “आमची आयकॉनिक प्रेमिका”, “माधुरीजी खूप सुंदर”, “लक्षवेधी हावभाव” अशा कमेंट्स करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या माधुरी ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. याशिवाय जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नुकतीच तिची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या आला होता.

- Advertisement -

दरम्यान मराठमोळ्या माधुरीबद्दल बोलायचे झाल्यास अलीकडेच तिची निर्मिती असणारा ‘पंचक’ हा मराठी सिनेमा विशेष चर्चेत आलेला. सध्या ती ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमाचे परिक्षण करते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -