घरमनोरंजनमाधुरी दिक्षितने कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा दिला फंडा,म्हणाली 'या' वस्तु घरी असणे गरजेचं...

माधुरी दिक्षितने कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा दिला फंडा,म्हणाली ‘या’ वस्तु घरी असणे गरजेचं…

Subscribe

कोव्हिड पासून काळजी घेण्यासाठी घरी लागणार्‍या गरजेच्या वस्तु'' तसेच हॅशटॅग देत घरी रहा सुरक्षित रहा असं लोकांना आवाहन केलं आहे.

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. अशातच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकार ‘घरी रहा सुरक्षित रहा’ असे आवाहन वेळोवेळी करत आहे. त्याशिवाय अनेक कोरोनारुग्ण आणि नागरिक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान या व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती बळकट ठेवण्याठी अनेक उपाय करतांना दिसत आहेत. नुकतच अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन लोकांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करत व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच आपल्या जवळ कोरोना पासून बचावाकरिता कोणत्या वस्तु आवश्यक सोबत बाळगल्या पाहिजे याची देखील संपूर्ण माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

व्हिडिओ मध्ये माधुरी बोलताना दिसत आहे की,” सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोना पासून बचावाकरिता घरी काही वस्तु असणे गरजेचे आहे. हैंड सैनिटाइजर, थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल तपासण्याकरिता पल्सऑक्सीमीटर तसेच जर तुम्ही घरी बनवण्यात येणार्‍या मास्क चा वापर करत असणार तर दोन मास्क चा वापर करा किंवा शक्यतो N95 मास्क लावूनच घरा बाहेर पडा. तसेच माधुरीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की,” कोव्हिड पासून काळजी घेण्यासाठी घरी लागणार्‍या गरजेच्या वस्तु” तसेच हॅशटॅग देत घरी रहा सुरक्षित रहा असं लोकांना आवाहन केलं आहे.


हे हि वाचा – नागपुर ते हैदराबाद एयरलिफ्ट केलेल्या कोरोनारुग्ण भारतीच्या निधनानंतर सोनू सुदने व्यक्त केलं दुख:

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -