बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ने ‘कलंक’ चित्रपटात सुप्रसिद्ध बेगमची व्यक्तीरेखा साकारली आहे. ही व्यक्तीरेखा याआधी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी करणार होती. तिच्या निधनानंतर बेगमची व्यक्तीरेखा दिली गेली. ‘कलंक’ चित्रपट टिझर लॉंचच्यावेळी माधुरीला विचारले गेले की, ‘कलंक’च्या सेटवर बेगम साकारतांनाचा अनुभव कसा होता, त्यावेळी बेगम साकारणं हे तसं कठीण होतं त्यापेक्षा अधिक भावनिक होतं, असे माधुरी दीक्षितने सांगितले. ज्यावेळी या व्यक्तीरेखासाठी विचारले गेले त्यावेळी माझ्यासाठी हे आजिबात सोपे नव्हते, श्रीदेवी बद्दल माझ्यामनात पुर्वीपासूनच आदर आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या निधनाची घटना समजली तेव्हा ही बातमी खूप धक्कादायक होती. तिचा सुंदर अभिनयच नव्हता तर एक माणुस म्हणूनही उत्तम होती.
It was my honour to play such an enchanting character. Here’s Bahaar Begum! #WomenOfKalank #Kalank @duttsanjay #AdityaRoyKapur @Varun_dvn @aliaa08 @sonakshisinha @abhivarman @ipritamofficial @karanjohar #SajidNadiadwala @apoorvamehta18 @foxstarhindi @DharmaMovies @NGEMovies pic.twitter.com/O5mFwfnbcv
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) March 8, 2019
‘कलंक’चा एक भाग
“एका अभिनेत्रीच्या रूपात जी व्यक्तीरेखा साकारायची असते, त्यावेळी ती वेगळी बाब असते. कारण त्यात आपले काही वेगळ्पण देता येते. परंतु, ‘कलंक’ची संपुर्ण टिम सेटवर श्रीदेवींची आठवण काढायचेत,कारण श्रीदेवी जरी हयात नसली तरी ती ‘कलंक’चा एक भाग होती. ” असेही माधुरीने म्हटले. माधुरीने असेही सांगितले की, “एकदा कोणतेही काम करणे आपण सुरू केले की,आपल्याला पुढे जाऊन ते काम करावंच लागते. मी ही असेच केले पण ‘कलंक’मध्ये कामं करतांना, प्रत्येकवेळी श्रीदेवींची आठवण मनात होती. ”
१७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित
अभिषेक वर्मा दिग्दर्शित ‘कलंक’ या चित्रपटात संजय दत्त, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिंहा या मुख्य भुमिका साकारतांना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. ‘कलंक’ हा चित्रपट १७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हे ही वाचा- तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘कलंक’चं पहिलं पोस्टर लाँच