बॉलिवडूची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली. लक्स गोल्डन रोझ आवर्ड पुरस्कार कार्यक्रमादरम्यान माधुरीने श्रीदेवीयांच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. हवा हवाई या गाण्यावर माधूरीने श्रीदेवी प्रमाणे स्टेप्स केलेत. गाण्यात श्रीदेवींनी घातलेल्या कपड्यांसारखेच कपडे माधुरीने यावेळी घातले होते. याचा व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला आहे. या व्यतिरिक्त माधुरीने हेमा मालिनी यांचे ड्रिम गर्ल, हेलन यांचे ये मेरा दिल आणि तम्मा तम्मा लोगे या गाण्यावरही डान्स केला.
ऐश्वर्यानेही केले कौतुक
या कार्यक्रमला ऐश्वर्या राय बच्चनने ही उपस्थिती लावली. माधुरीच्या डान्सनंतर ऐश्वर्याने ही कौतुक केले आहे. “माधुरी तुझा डान्स चांगला झाला. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. श्रीदेवी जींना सलाम. आम्ही त्यांना प्रेम करतो आणि त्या सदैव आमच्या आठवणीत आहात.” अशा शब्दांमध्ये ऐश्वर्याने माधुरीचे कौतुक केले.
View this post on Instagram
“MADHURI your performance was amazing, we love you!”❤️ – @aishwaryaraibachchan_arb
जान्हवी ही उपस्थित
या कार्यक्रमाला श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरही उपस्थित होती. “माझी आई लक्सची सुपरस्टार आहे त्यामुळे हा स्टेज माझ्यासाठी खास आहे. आज माझी आई असती तर तिलाही अभिमान वाटला असता. मी प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी अजून महेनत करेल. मला खात्री आहे प्रेक्षकांना माझे काम आवडेल.” या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाहरूख खान आणि वरून धवन यांनी केली. याच बरोबर कार्यक्रमात आलीया भट्ट, करिना कपूर, करिश्मा कपूर, इसाबेला कैफ हे उपस्थित होते.