मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण, तिच्या आईच आज सकाळी निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी स्नेहलता दीक्षित यांनी अखेरचा श्वास घेतला. माधुरी दीक्षित आणि तिच्या आईचे काही खास क्षण फोटोद्वांरे पाहुयात.
(सर्व फोटो – गुगल स्त्रोत)
- Advertisement -
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३ वाजता वरळीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, स्नेहलता यांचे आज सकाळी निधन झाले. अंत्यसंस्कार आज दुपारी 3 वाजता वैकुंठ धाम, डॉ ई मोसेस रोड, (फोर सीझन्स हॉटेल समोर), जिजामाता नगर, वरळी येथे होणार आहे.
जून 2022 मध्ये, माधुरीने आईच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक मनापासून पोस्ट लिहिली होती. “वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई! असं म्हणतात की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. हे अधिक योग्य असू शकत नाहीत. तू माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून, तू शिकवलेले धडे ही तुझ्याकडून माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुला चांगले आरोग्य आणि आनंदाची इच्छा व्यक्त करते.”
स्नेहलता यांनी 2013 मध्ये गुलाब गँग या चित्रपटासाठी माधुरीसोबत काम केले होते.
IANS ला दिलेल्या मुलाखतीत, चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा म्हणाले होते, “आम्ही माधुरीला चित्रपटातील गाणे गाण्यासाठी संपर्क साधला तेव्हा तिने आनंदाने गाण गाण्यास होकार दिला.
जेव्हा ती रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा ती तिच्या आईसोबत आली आणि आम्हाला कळले की तिची आई खूप चांगली गायिका आहे. म्हणून आम्ही तिच्या आईला विचारले की ती गाणे गाऊ शकते का? अखेरीस, आम्ही माधुरी आणि तिची आई दोघांनाही चित्रपटात गाणे म्हणायला लावले.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे वयाच्या 90 व्या वर्षी रविवारी (12 मार्च) निधन झाले. सध्या माधुरी आणि तिचे कुटुंबीय दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत....