आईची खोली रिकामी दिसली… आईच्या मृत्यूनंतर माधुरीने शेअर केली भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे वयाच्या 90 व्या वर्षी रविवारी (12 मार्च) निधन झाले. सध्या माधुरी आणि तिचे कुटुंबीय दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आईच्या जाण्याने माधुरीलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अशातच माधुरीने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आईसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

माधुरीने शेअर केली भावनिक पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरीने आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय की, “आज सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा मला माझ्या आईची खोली रिकामी दिसली, ती वास्तवात दिसत नव्हती. तिने आम्हाला मिठीत घेतलं आणि जीवन साजरे करायला शिकवले, तिने अनेक लोकांना खूप काही दिले आहे. आम्हाला नेहमी तिची आठवण येत राहील, ती आमच्या आठवणीत जिवंत राहील. आम्ही आमच्या आठवणींमधून तिच्या जीवनाचा सोहळा एकत्र साजरा करू…ओम शांती.” असं माधुरीने लिहिलंय.

माधुरीने दिला आईला शेवटचा निरोप

माधुरी आपले पती डॉ. श्रीराम नेने आणि धाकटा मुलगा रायन यांच्यासोबत आईच्या शेवटच्या अंत्ययात्रेत दिसली होती. यावेळी माधुरीला अश्रू अनावर झाले होते. मुंबईतील वरळीच्या स्मशामभूमीत माधुरीच्या आईवर अंत्यसंस्कार पार पडले.

‘गुलाब गॅंग’ चित्रपटात केलं माधुरीसोबत काम

माधुरीची आई स्नेहलता दीक्षित यांनी 2013 मध्ये माधुरीच्या ‘गुलाब गॅंग’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटासाठी तिच्या आईने गाणे गायले होते.

 


हेही वाचा :

आधी चक्कर आली, मग दातखिळी बसली; मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू