Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन सुपरस्टार विजयने टॅक्स नाही भरला, हाय कोर्टाने ठोठावला एक लाख रुपयांचा दंड

सुपरस्टार विजयने टॅक्स नाही भरला, हाय कोर्टाने ठोठावला एक लाख रुपयांचा दंड

चित्रपटात काम करणाऱ्या नायकाकडून टॅक्स चोरी करणार अशी अपेक्षा नाही.

Related Story

- Advertisement -

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) वर मद्रास हाय कोर्टाने (Madras high court) 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने विजयला हा दंड त्याच्या लग्जरी इंपोर्टेड कार रॉल्स रॉयस घोस्टच्या एंट्री टॅक्स न भरल्याबद्दल ठोठावला आहे. दंड ठोठावल्या नंतर कोर्टाने ॲक्टर विजयवर कडक शब्दात टिका करत त्याला चांगलेच सुनावले आहे. कोर्टाने सांगितले आहे की विजयने भरलेल्या दंडाची रक्काम तमिलनाडु मुख्यमंत्री कोव्हिड रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात येणार आहे.मद्रास हाय कोर्टातील न्यायाधीश एसएम सुब्रमण्यम यांनी विजयवर टॅक्सची रक्कम न भरल्याबद्दल विजयच्या फॅन ग्रुपच्या सर्व याचिका रद्द करुन आपला निर्णय दिला आहे, “जे चाहते अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यात एका नायकाप्रमाणे पाहतात, असे अभिनेता तमिलनाडु सारख्या राज्याचे शासक बनले आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या नायकाकडून टॅक्स चोरी करणार अशी अपेक्षा नाही. कारण, हा ॲटीट्यूड अँन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे.” तसेच कडत शब्दा न्यायाधीश पुढे म्हणाले, “हे अभिनेता स्वत:ला समाजात सामाजिक न्याय स्थापित करणारे चॅम्पियन समजतात. यांच्या सिनेमात समाजात होणाऱ्या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवण्यात येतो. पण यांनी आता टॅक्सचोरी केला आहे. कोर्टाला हे मान्य नाही.

- Advertisement -

एकीकडे सामान्य मानसाला टॅक्स देण्यासाठी आणि न्यायपुर्ण जिवन जगण्यास जागरुक करण्यात येते. तर दुसरीकडे धनवान आणि प्रभावशाली व्यक्ती टॅक्सचोरी करतात. अभिनेत्याने त्यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना समजायला हव्या जे लोक तिकिट खरेदि करुन त्यांचे सिनेमा पाहतात. कोर्टाच्या आदेशानुसार विजयला टॅक्स कर विभागाला 2 आठवड्याच्या आत भरावा लागेल.”हे हि वाचा – ‘तूफ़ान’ सिनेमाच्या प्रेरणादायी टाइटल ट्रॅकला प्रेक्षकांनी दिला भरघोस प्रतिसाद- Advertisement -

 

- Advertisement -