प्रियंका आणि निक जोनसच्या घटस्फोटाबाबत मधू चोप्रा यांनी केला खुलासा, म्हणाल्या…

प्रियंकाच्या आईने दोघांच्या घटस्फोटवर केलेल्या खुलाश्यानंतर चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

Madu chopra reaction on priyanka chopra and nicj jonam divvorce
प्रियांका आणि निक जोनसच्या घटस्फोटाबाबत मधू चोप्रा यांनी केला खुलासा, म्हणाल्या...

बॉलिवूड तसेच हॉलिवूडचे रोमँटीक कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस कायम चर्चेत असतात मात्र यावेळी त्यांच्या चर्चेचे कारण त्याचा घटस्फोट असल्याचे समोर आले आहे. प्रियंकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा पती निक जोसनचे आडनाव काढून टाकले आहे. प्रियंकाच्या प्रत्येक सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा जोनस असे नाव होते. मात्र सोमवारी अचानक पियंकाने तिच्या नावापुढून जोनस हे नाव काढून टाकले आणि सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले. प्रियंका आणि निक जोनस घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रियंकाने नवऱ्याचे आडनाव तिच्या नावासमोरुन काढल्यानंतर तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसला. दोघांच्या घटस्फोटोच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. मात्र या सगळ्या चर्चांनंतर प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी खुलासा केला आहे.

 

प्रियंका आणि निक जोनस हे वेगळे होणार का या प्रश्नावर मधू चोप्रा यांनी न्यूज १८ वृत्तवाहिनीशी बोलताना प्रियंका आणि निक यांच्या घटस्फोटोच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले. दोघेही फार आनंदी असून त्याच्याविषयीच्या सर्व बातम्या चुकीच्या आणि खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी दोघांच्या नात्याविषयीची चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन देखील केले. प्रियंका आणि निक जोनस हे क्यूट कपल खरंच घटस्फोट घेणार का याविषयी त्यांच्या फॅन्सच्या मनात धाकधूक लागून राहिली होती. मात्र मधू चोप्रा यांच्या खुलाश्यामुळे चाहत्यांचा जीव देखील भांड्यात पडला आहे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटी देखील प्रियंका आणि निक यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यासाठी आतूर होते. प्रियंकाच्या आईने दोघांच्या घटस्फोटवर केलेल्या खुलाश्यानंतर चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

एकीकडे प्रियंका आणि निक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते त्यातच निक जोनसने त्याच्या सोशल मीडियावर त्याचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात निक आपल्या बॉडीवर फुल कॉन्सट्रेट करताना दिसत होता. निकच्या या व्हिडिओवर प्रियंकाने देखील छान कमेंट केलेली पहायला मिळाली.


हेही वाचा – ‘बंटी और बबली पार्ट २’ मध्ये अभिषेक बच्चनला ‘या’ कारणामुळे डच्चू