घरमनोरंजनमहाक्षय चक्रवर्तीचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

महाक्षय चक्रवर्तीचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

Subscribe

मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली आणि मुलगा महाक्षय चकवर्ती यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. कोर्टाकडून हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय अर्थात मिमोहला दिलासा मिळालेला नाही. पाच दिवसांपूर्वी महाक्षय चक्रवर्तीचं नाव बलात्काराच्या प्रकरणात अडकलं आहे. मिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून मिमोहला दिलासा मिळालेला नाही. महाक्षय चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीनं गर्भपात केल्याच्या आरोपावरुन महाक्षय चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तर, मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली यांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते. यासंदर्भात दोघांनाही अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे.

भोजपुरी अभिनेत्रीने केले आहेत आरोप

मिथुन चक्रवर्ती याचा मुलगा महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे ७ जुलैला लग्न होणार आहे. मदालसा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. महाक्षय आणि मदालसा यांच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच महाक्षयवर बलात्काराचा आरोप करण्यात आला. भोजपुरी चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने हे आरोप केले आहेत.

- Advertisement -

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

महाक्षय चक्रवर्ती याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केलाय. २०१५ मध्ये महाक्षयने कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केला. त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून महाक्षयने बलात्कार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. चार वर्षाच्या प्रेमसंबंधामध्ये ही अभिनेत्री गरोदर राहिली. त्यानंतर महाक्षय आणि त्याची आई योगिताने जबरदस्ती गोळ्या खायला देऊन गर्भपात केल्याचा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -