उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरु झाला. आतापर्यंत अगणित भाविकांनी या भक्ती सागराचा अनुभव घेतला. महाकुंभ मेळ्याचे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे जगभरातील विविध भागातून अनेक लोक या मेळ्यात सहभागी होण्यासाठी येत असतात. ज्यामध्ये दिग्गज मंडळींचाही समावेश आहे. अगदी राजकीय नेते, बॉलिवूड सिनेकलाकार आणि विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी या मेळ्याला भेट देतात. यंदा महाकुंभ मेळा 2025 मध्ये अनेक मराठी कलाकारांनीदेखील हजेरी लावल्याचे दिसले. यामध्ये कोणकोणत्या कलाकारांची नावे आहेत, हे जाणून घेऊया. (Mahakumbh 2025 Marathi celebrities take holy bath in Ganga)
1. प्राजक्ता माळी
मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने अलीकडेच कुंभ मेळ्यात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने गंगेत पवित्र स्नान करीत दिव्य अनुभव घेतला.
View this post on Instagram
प्राजक्ताने हा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. तिचा महाकुंभ मेळ्यातील प्रवासाचा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, ‘Once in a Lifetime Experience लहानपणापासूनच कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. 144 वर्षांनी होणारा हा मेळा प्रत्यक्ष पाहण्याची आणि अनुभवण्याची इच्छा होती, म्हणून मी इथे पोहोचले’.
2. प्राजक्ता गायकवाड
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेसुद्धा महाकुंभ मेळ्यात गंगा स्नान केले. हा अनुभव तिने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.
View this post on Instagram
सोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘शेड्यूलमधून कसा वेळ मिळेल? कसं जाणं होईल? काहीच माहीत नव्हतं… पण 144 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला जायचं म्हणजे जायचं असं मनाशी ठरवलं होतं आणि अखेर तो योग आलाच…गंगा, यमुना, सरस्वती संगम”…धर्मो रक्षति रक्षितः’.
3. सौरभ चौगुले
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेता सौरभ चौगुलेनेदेखील महाकुंभ मेळ्यात गंगा स्नान केले. याविषयी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, ‘अचानक जुना मित्र कुंभला जातोय असं सांगतो काय…त्याच्या ग्रुपमधला एक मेंबर कॅन्सल होतो काय… आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मिळाला जायचं ठरतं काय…निव्वळ योगायोग असे म्हणतात जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही’.
View this post on Instagram
‘असच काहीसं हे एक…144 वर्षानंतर येणाऱ्या महा कुंभमेळा…असं म्हणतात, तीन पिढ्यानंतर एका पिढीला हा योग मिळतो आणि मला तो मिळाला. देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं. हर हर गंगे, हर हर महादेव!’
4. प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्याची पत्नी स्नेहल तरडेदेखील महाकुंभ मेळा 2025 मध्ये दाखल झाली होती.
View this post on Instagram
मौनी अमावस्येचे औचित्य साधून या जोडप्याने गंगेत अमृत स्नान केले. हा अनुभव शेअर करताना स्नेहलने लिहिले, ‘अद्भुत अनुभव…त्रिवेणी संगम स्नान’.
हेही पहा –
Dakshata Joil : सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेत्रीची रंगभूमीवर एंट्री