Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनMaharani S4 : सोनी लिव्‍हच्या ‘महाराणी 4' सिरीजचा टीझर रिलीज

Maharani S4 : सोनी लिव्‍हच्या ‘महाराणी 4′ सिरीजचा टीझर रिलीज

Subscribe

सिनेमांइतकाच सिरीज पाहणारा प्रेक्षक वर्ग देखील फार मोठा आहे. अशा सिरीजप्रेमींसाठी ‘महाराणी’ परतली आहे.. होय. सोनी लिव्‍हने नुकताच ‘महाराणी’ सीरिजच्या चौथ्या पर्वाची घोषणा करत टिझर रिलीज केला आहे. हा टिझर एका स्त्रीच्या प्रबळ शक्‍तीला दर्शवतो. ‘महाराणी ४’मध्‍ये पुन्‍हा एकदा हुमा कुरेशी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. अत्यंत लक्षवेधी आणि रोमांचक असा हा टिझर समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिरीजबाबत उत्सुकता वाढली आहे. (Maharani S4 upcoming web series teaser released)

या सिरींजमधील नायिका अर्थात राणी भारती ही नीडर आहे. तिच्या निडर क्षमतेमध्‍ये आता अधिक प्रखरतेची भर पडताना दिसणार आहे. निरक्षर गृहिणीपासून सत्तेला हादरवून टाकण्‍याचे धाडस दाखवणाऱ्या मुख्‍यमंत्रीपर्यंत सत्तेसाठी संघर्ष, विश्‍वासघात आणि राजकीय युद्ध नव्‍या उंचीवर पोहचवणाऱ्या राणीचा एक नवा प्रवास घेऊन नवा सिझन येतो आहे. ज्यात महाराणी पुन्हा एकदा एका नवीन राजकीय लढाईसाठी परतली आहे. ‘महाराणी सीझन 4’चा नवा टिझर कमाल आहे. त्यामुळे सोशल मीडियावर महाराणीची चर्चा आहे.

या नव्या सीझनमध्ये राणी भारती पुन्हा एकदा राजकीय आव्हानांना तोंड देताना दिसेल. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या टीझरमध्ये, राणी भारती तिच्या ऑफिसमध्ये सावलीत पुढे-मागे धावताना दिसतेय. या टीझरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तयार व्हा.. महाराणीचे चौथ्यांथा स्वागत करण्यासाठी! MaharaniS4 चा टीझर आता प्रदर्शित झाला आहे’. या टीझरमध्ये हुमाचा आवाज ऐकू येतोय. ज्यात ती म्हणतेय, ‘काहींनी मला अशिक्षित म्हटले. काहींनी मला खुनी म्हटले. तर काहींनी म्हटले की मी भावी पंतप्रधान होईन. पण मी सत्तेने प्रेरित नाही, माझे हृदय माझ्या कुटुंबासाठी धडधडते… आणि बिहार माझे खरे कुटुंब आहे. आणि जर कोणी माझ्या कुटुंबाला हानी पोहोचवण्याचे धाडस केले तर मी त्यांच्या राजवटीचा पाया हादरवून टाकेन’.

नरेन कुमार आणि डिंपल खरबंदा निर्मित, ‘महाराणी’चा पहिला सिझन 28 मे 2021 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. तर दुसरा सीझन जुलै 2022 मध्ये आणि तिसरा सीझन गेल्या मार्चमध्ये आला. यानंतर आता पुनीत प्रकाश दिग्दर्शित या सिरीजचा चौथा भाग लवकरच आपल्या भेटीस येत आहे. सुभाष कपूर, नंदन सिंग आणि उमाशंकर सिंग यांनी कथानकाचे लेखन केले आहे. या सिरीजमध्ये हुमा कुरेशीसोबत सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, कानी कुश्रुती, अनुजा साठे, दिब्येंदु भट्टाचार्य आणि इनामुलहक हे कलाकार इतर महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

हेही पहा –

Fashion Tips : स्लिम गर्ल्ससाठी कियारा अडवानीच्या या साड्या बेस्ट