Maharashtra Election 2024 : आज 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नागरिकांनी मतदान करत आपला हक्क आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सर्व कलाकार मतदान केल्यानंतर इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, हेमंत ढोमे, रवी जाधव, सायली संजीव, मंदार चांदवडकर, तेजस्विनी पंडित, सुनील बर्वे, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकारांनी मतदानाचं कर्तव्य पार पडलं आहे. यासंदर्भात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
अभिनेता अक्षय कुमारने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावरील व्यवस्था चांगली असल्याचं त्याने यावेळी म्हटलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन त्याने केलंय.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
“करा आज योग्य selection…Today is the day of election…समाजात हवं असेल जर perfection…तर करू नका या संधी चं rejection”, अशी चारोळी सोनालीने केली.
View this post on Instagram
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिलं की, मी मतदान केलं. तुम्ही?…लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा.
View this post on Instagram
लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हेमंत ढोमेने मतदान केल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
अभिनेता रितेश देशमुखने मतदान केलं. यावेळी त्याने प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.