घर मनोरंजन चाकरमानी निघाले... मालवणी भाषेत कॅप्शन, निखिल बनेचा व्हिडीओ व्हायरल

चाकरमानी निघाले… मालवणी भाषेत कॅप्शन, निखिल बनेचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

गणेशोत्सव आला की चाकरमान्यांना उत्सुकता असते ती म्हणजे कोकणात जाण्याची. यासाठी महिनाभर आधीपासूनच जोरदार तयारी करण्यात येते. गावी कोणकोणत्या वस्तू घेऊन जायच्या आहेत, तिकिट बूकिंग, बस कधी सुटणार, किती दिवसांचा वस्तीचा बेत आहे इत्यादी. अशाच प्रकारे सर्वांचा लाडका हास्यजत्रा फेम निखिल बने याच्या घरी देखील अशीच स्थिती पाहायला मिळतेय. निखलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत त्याच्या घरची मंडळी गणपतीसाठी कोकणात जाण्याच्या तयारीत आहेत. यासाठी कशा प्रकारे लगबग सुरू आहे. सामानाची बांधाबांद, प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी गाडीसमोर फोडलेला नारळ तसेच प्रार्थना करताना निखिलचे कुटुंबिय दिसत आहे. निखिलने या व्हिडीओला,”चाकरमानी निघाले… आम्ही झो जातव पुढं, तुम्ही या मागना..आतुरता आगमनाची” अशा अस्सल मालवणी भाषेत कॅप्शन दिलंय.

व्हिडीओ पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

- Advertisement -

आपला लाडका गणपती बप्पा 19 सप्टेंबरला घरोघरी विराजमान झाला. बाप्पाच्या आगमनसोहळ्यापासून ते दहा दिवस होणाऱ्या पारंपारिक विधिमध्ये प्रत्येकजण उत्साहात दंग असतो. मात्र मुंबईतील किंवा इतर ठिकाणी कामानिमित्त गेलेला चाकरमाणी आवर्जून शिमगा आणि खास गणेशोत्सवानिमित्त कोकणात हमखास येतो. आपल्या लाडक्या बाप्पाल पाहण्याची आस प्रत्येकाला लागून राहिली असते. कोकणकरांसाठी गणेशोत्सव तर अत्याधिक विषेश आणि खास असतो. आणि आपली परंपरा संस्कृति लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येईल यासाठी निखिलही प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे.


हे हि वाचा – छगन भुजबळांच्या उपस्थितीत अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -