लोणावळ्यात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम; पिकनिक दरम्यानचे फोटो व्हायरल

सध्या ही संपूर्ण टीम लोणावळ्याच्या एका रिसॉर्टमध्ये एन्जॉय करत आहे. या पिकनिक दरम्यानचा एक फोटो अभिनेता समीर चौगुले याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे

सोनी मराठी टेलिव्हिजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्याक्रमातील प्रत्येक कलाकार उत्तम सादरीकरण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. सध्या या कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात चाहते आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला असून लवकरच नवे पर्व घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ५ जुलै रोजी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पुढील पर्वाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

दरम्यान, या कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण होण्याआधी या कार्यक्रमातील कलाकार पिकनिकला गेल्याचे दिसत आहे. सध्या ही संपूर्ण टीम लोणावळ्याच्या एका रिसॉर्टमध्ये एन्जॉय करत आहे. या पिकनिक दरम्यानचा एक फोटो अभिनेता समीर चौगुले याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम दिसत आहे. याशिवाय अभिनेत्री नम्रता संभेराव हिने सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या पिकनिक दरम्यानचे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नम्रता आणि रसिका सुद्धा दिसत आहे, नभ उतरू आलं या गाण्यावर दोघीही पावसात धम्माल करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुद्धा पिकनिक दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम २०१८ पासून सुरू झाला असून ५ जुलै रोजी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पुढील पर्वाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

 


हेही वाचा :बहुचर्चित ‘लायगर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने शेअर केलेल्या विजय देवरकोंडाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा