घरमनोरंजनमहेंद्रसिंह धोनी साकारणार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका; फोटो व्हायरल

महेंद्रसिंह धोनी साकारणार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका; फोटो व्हायरल

Subscribe

भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने क्रिकेटसह अनेक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. क्रिकेटनंतर धोनी मनोरंजनक्षेत्रात उतरला असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आला होता. अशातच आता धोनीच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे धोनीच्या या नव्या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.

महेंद्रसिंह धोनी हा अनेक जाहिरातींच्या माध्यमातून सतत चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला धोनीचा हा लूक एका जाहिरातीतला असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये धोनी खाकी वर्दीमध्ये दिसत असून त्याने यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला धोनीच्या या लूकवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने ‘धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेटेड लिमिटेड’ ही निर्माती कंपनी सुरू केली आहे. धोनीची निर्माती कंपनी चित्रपटांची निर्मिती करणार आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीच्या निर्माती कंपनीच्या ‘एलएसजी: लेट्स गेट मॅरीड’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

 


हेही वाचा :

9 व्या दिवशीही ‘पठाण’ची जोरदार कमाई; गल्ल्यात ‘इतक्या’ कोटींची वाढ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -