‘मार्कशीट’चा फर्स्ट लूक रिलीज; इमरान जाहिद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

चित्रपटात बॉलिवुड अभिनेता इमरान जाहिद प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘मार्कशीट’ या चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट यांनी आगामी चित्रपट ‘मार्कशीट’ चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज केला आहे. या चित्रपटात बॉलिवुड अभिनेता इमरान जाहिद प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इमरान पदार्पण करत आहे.या चित्रपटात इमरान बिहारच्या एका शाळेतील टॉपर विद्यार्थाची भूमिका साकारणार असून तो दिल्लीमध्ये IAS ऑफिसर बनण्यासाठी येतो.

या चित्रपटातील पहिल्या लूकमध्ये इमरान जाहिदच्या चारही बाजूला पुस्तकांची दुकाने आहे. या सोबतच बरेच कोचिंग क्लासेसचे असणारे पोस्टर, बॅनरसुद्धा दिसत आहे. शिक्षणाच्या काही मुद्द्यांवर आधारित असलेल्या या चित्रपटावर मागील काही दिवसापुर्वी वाद देखील सुरू होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश रंजन कुमार असून यामध्ये इमरानच्या विरूद्ध श्रुती सोधी देखील दिसणार आहे. श्रुती सोधी ही अभिनेत्री पंजाबी आणि तेलगू चित्रपटात दिसली होती.