घरमनोरंजन‘भाई: व्यक्ती की वल्ली’ची प्रेक्षकांना उत्सुकता

‘भाई: व्यक्ती की वल्ली’ची प्रेक्षकांना उत्सुकता

Subscribe

पु.ल. देशपांडे हे नाव जरी ऐकलं तरी म्हैस, पानाची टपरी, पाळीव प्राणी,चितळे मास्तर, सखाराम गटणे, अशी त्यांची अनेक पात्रं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर पुढच्या वर्षी ४ जानेवारीला घेऊन येणार आहे.

पु. ल. वर असणारे मराठी माणसांचं प्रेम

‘पुलंवर मराठी माणसाचे किती प्रेम आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांचा अभिनय, त्यांचे साहित्य, त्यांचे वक्तृत्व,  त्यांचा संगीताचा अभ्यास, जपलेले सामाजिक भान हे सर्वांनाच माहीत आहे. पण पु. लं. देशपांडे हा अष्टपैलू अवलिया नेमका माणूस म्हणून कसा होता? या लाडक्या व्यक्तिमत्वाचं व्यक्तिगत आयुष्य नेमकं कसं होतं हे या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत असून चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारणार आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.

- Advertisement -

चित्रपट का करावा वाटला?

‘भाई: व्यक्ती की वल्ली’मधून पु. ल. देशपांडेंच्या आयुष्याचे अप्रकाशित पैलू प्रेक्षकांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.” असं महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची घोषणा करताना सांगितलं. तरुण वयात प्रतिकूल परिस्थितीत पुलंनी घेतलेले उच्च शिक्षण, चित्रपट व्यवसायात त्यांना आलेले अनुभव, पत्नी सुनीता देशपांडे यांच्यासोबत आयुष्यभरासाठी जोडलेले भावबंध, आकाशवाणीमध्ये गाजवलेली कारकीर्द या सर्व अंगांचा वेध घेत पुलंच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्यातील माणूसपणाचा वेगळा आलेख मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -