दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट वादात

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट वादात सापडलाय. लालबाग-परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुलांबाबत आक्षेपार्ह चित्रण आढळलंय. त्यावरून आता राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि महिला आयोगानं आक्रमक पवित्रा घेतलाय.