घरताज्या घडामोडीमहेश मांजरेकर दिग्दर्शित वीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा, रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका

महेश मांजरेकर दिग्दर्शित वीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा, रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका

Subscribe

सावरकरांवर आधारित या सिनेमाचे शुटींग जून २०२२ पासून सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथे सिनेमाचे शुटींग होणार आहे.

नाय वरण भात लोन्चा या सिनेमानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महेश मांजेकरांनी स्वातंत्र्यवीर विनायक दमोदर सावरकर (vinayak damodar savarkar biopic ) यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा केली आहे. गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा (randeep hooda)  या सिनेमात सावरकरांची मुख्य भूमिका साकारणार आहे. रणदीप हुड्डा पहिल्यांदा एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमधून यावेळी रणदीपच्या अभिनयाचा कस लागणार आहे. रणदीपने सिनेमातील त्याचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

- Advertisement -

सावरकरांवर आधारित या सिनेमाचे शुटींग जून २०२२ पासून सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथे सिनेमाचे शुटींग होणार आहे. सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र चळवळीत दिलेल्या बहुमुल्य योगदानावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे. सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजेकर करत आहेत. तर आनंद पंडित आणि संदीप सिंग सिनेमाची निर्मिती करत आहेत.

- Advertisement -

सावरकरांची भूमिका साकारायला मिळणार याने रणदीप फार खुश असून त्याने म्हटलेय, “असे अनेक नायक आहेत ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची आणि विशेष भूमिका बजावली आहे. परंतु प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळाले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरही अशाच नायकांपैकी एक आहेत. ते अत्यंत प्रभावशाली आहेत त्यांची कथा सागांयलाच हवी”.

दिग्दर्शक महेश मांजरेकर सिनेमाविषयी म्हणतात, “स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित केलेल्या कथा सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा असा सिनेमा आहे जो आपल्या सर्वांना इतिहासाची उजळणी करण्यासाठी भाग पाडले. संदीप सिंग सोबत करण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती त्यांच्यासोबत मला काम करायचे होते आणि या सिनेमानिमित्त आम्ही एकत्र काम करत आहोत याचा मला आनंद आहे”.


हेही वाचा –  ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या कोटामध्ये 21 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -