घरताज्या घडामोडीमहेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर, रुग्णालयातून डिस्चार्ज

महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर, रुग्णालयातून डिस्चार्ज

Subscribe

चित्रपटसृष्टीत बरेच असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. आता या यादीमध्ये लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे नाव जोडले गेले आहे. नुकतीच महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. महेश मांजरेकर यूरिनरी ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त असून त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यात सांगितले होते. त्यामुळे आता महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते पुन्हा घरी परले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईच्या एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये १० दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. आता दिग्दर्शक महेश मांजरेकर घरी परतले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर महेश मांजरेकर यांचे नाव चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. मराठीसह त्यांनी हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीत काम केले आहे. सर्वात पहिल्यांदा महेश मांजरेकर दूरदर्शनवरील एक मराठी सीरिज ‘क्षितीज’मध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि बऱ्याच चित्रपटात अभिनय केला. ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘रन’, ‘दस कहानिया’, ‘दबंग’ हे चित्रपट महेश मांजरेकर यांच्या हिट चित्रपटांपैकी आहेत. याशिवाय त्यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

आता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सईने २०१९ मध्ये सलमान खानचा चित्रपट ‘दबंग ३’ मध्ये काम केले आहे. या चित्रपटात सईने सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

- Advertisement -


हेही वाचा – ‘नुसत्या फुलाच्या फोटोलाही लोकं मास्टरबेशन सीनसोबत लिंक करतात’; स्वराने ट्रोलर्सवर साधला निशाणा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -