Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन महेश मांजरेकरांच्या मुलाचे हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण

महेश मांजरेकरांच्या मुलाचे हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण

Subscribe

सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी मराठीसह बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. महेश मांजरेकर यांच्यासह त्यांची पत्नी मेधा मांजरेकर आणि त्यांची मुलं सई, सत्या व गौरी मांजरेकरही कलाक्षेत्रामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्या मांजरेकर लवकरच महेश यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामधून मुख्य मावळा म्हणून काम करताना दिसणार आहे.

या चित्रपट येण्याआधी सत्याने एक नवा व्यवसाय सुरू केला असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करताना याबाबत माहिती दिली आहे. सत्याने ‘सुका सुखी’ हे स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. ‘सुका सुखी’ फ्रॉम द मांजरेकरर्स किचन असा एक वेगळाच लोगो बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये सुक्या मच्छीचा आस्वाद सगळ्यांना घेता येणार आहे. सत्याची ही नवी सुरुवात खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय दुसरीकडे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी तो विशेष मेहनत घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suka Sukhi (@sukasukhi)

- Advertisement -

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात सत्या मांजरेकर मुख्य मावळा ही भूमिका साकारत आहे. वडिलांबरोबर काम करण्यास उत्सुक असलेला सत्या सध्या जीममध्ये घाम गाळत आहे. त्याने जीममध्ये वर्कआऊट करतानाचे बरेच व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

- Advertisement -

सत्याच्या करिअरविषयी
सत्या मांजरेकरने १९९५ मध्ये आई या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ग्रॅज्युएशननंतर, तो २००५ मध्ये ‘वाह लाइफ हो तो ऐसी’, २०१४ मध्ये ‘पोर बाजार’ आणि २०१५ मध्ये ‘जानिवा’ यासारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश माजरेकर दिग्दर्शित ‘एफयू : फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली होती. यावेळी आकाश ठोसर आणि संस्कृती बालगुडे यांनी त्याच्यासोबत त्याने काम केले आहे.

- Advertisment -