Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Ganesh Chaturthi 2021:‘माझा गणोबा’, गणेश भक्तांच्या भेटीला...

Ganesh Chaturthi 2021:‘माझा गणोबा’, गणेश भक्तांच्या भेटीला…

गाण्यातून बाप्पाकडे सुखाचे दान मागण्यात आले आहे. गणेशोत्सवावर कुठलंही संकट आलं तरी विघ्नहर्ता बाप्पा नेहमीच अशी संकटे निवारण करत आला आहे. आताही हे कोरोनाचं संकट बाप्पा दूर करेल, त्यासाठी या गाण्यातून गणपती बाप्पाला साकडे घालण्यात आले आहे

Related Story

- Advertisement -

यंदाचा गणेशोत्सव(Ganesh Chaturthi 2021) कोरोनाचं सावट(corona virus) असतानाही तितक्याच उत्साहात बाप्पाच्या आशीर्वादाने साजरा होणार आहे. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रिया क्रिएशन निर्मित ‘माझा गणोबा’ (majha ganoba)हे गणपती बाप्पाला वाहिलेलं अनोखं गाणे गणेशभक्तांच्या(ganesha) भेटीला आले आहे. ख्यातनाम पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप यांनी हे गाणं गायलं आहे. तर गीतकार वर्षा राजेंद्र हुंजे यांनी हे गाणं लिहिलंय. वर्षा राजेंद्र हुंजे ह्या गेल्या काही वर्षांपासून गीत, गझल लेखन करतात. यापूर्वीही वर्षा हुंजे यांनी अनेक कविता, गझल लिहिल्या आहेत. त्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरल्या. शिवाय भक्तीरंगात न्हालेली आषाढीवारी वरील त्यांची एक रचना युवागायिका कार्तिकी गायकवाडच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे. याशिवाय त्यांची एक गझल काही दिवसांतच रसिकांच्या भेटीला येणार आहे. जगावर कोरोनाचं संकट अजूनही घोंघावत आहे. त्याच अनुषंगाने वर्षा हुंजे यांनी बाप्पाला ‘माझा गणोबा’ या गाण्यातून साकडं घातलं आहे.(majha ganoba new ganpati song release)

या गाण्यातून बाप्पाकडे सुखाचे दान मागण्यात आले आहे. गणेशोत्सवावर कुठलंही संकट आलं तरी विघ्नहर्ता बाप्पा नेहमीच अशी संकटे निवारण करत आला आहे. आताही हे कोरोनाचं संकट बाप्पा दूर करेल, त्यासाठी या गाण्यातून गणपती बाप्पाला साकडे घालण्यात आले आहे ते गाण्याच्या शेवटच्या अंतऱ्यातून.
या गाण्याचं नुकतंच मुंबईतील आजीवासन स्टुडिओत रेकार्डिंग झालं. या रेकार्डिंग वेळी सुप्रसिद्ध गायक पं. सुरेश वाडकर हेही उपस्थित होते. त्यांनी गाणे ऐकून गाण्याच्या शब्दांची आणि संगीताची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या. या गाण्याचं संगीत संयोजन आणि संगीत नंदेश उमप यांनी केले आहे. शिवाय त्यांनी आपल्या पहाडी आणि ठसकेबाज आवाजात हे गाणं गायलंही आहे. ‘माझा गणोबा’ हे गीत प्रेक्षकांना उत्सवात बेभान होऊन थिरकायला लावणारे आहे. हे गाणं नंदेश उमप यांच्या ऑफिशियल युट्युब चॅनल आणि श्रिया क्रिएशनच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवरुन रिलीज झाले आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – Antim Poster : ‘अंतिम’ पोस्टरला भाईजानच्या चाहत्यांचा खतरनाक प्रतिसाद!

- Advertisement -