‘मेजर’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ; दोन दिवसातच केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

टॉलिवूड अभिनेता महेश बाबूच्या प्रोडक्शन खाली तयार झालेला अभिनेता आदिष शेष आणि सई मांजरेकर यांचा ‘मेजर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 13.5 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी तेलगू बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 7 कोटींची कमाई केली असून हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 1.10 कोटींची कमाई केली आहे.

‘मेजर’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ

हा चित्रपट 26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेले संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकत दुप्पट कमाई केली आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 1.50 कोटींची कमाई केली आहे. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने 24.50 कोटींची कमाई केली आहे.

‘विक्रम’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ सोबत मेजरचा सामना

‘मेजर’ चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला असून या चित्रपटाला हिंदी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘भूलभुलैया 2’ या चित्रपटासोबत सामना करावा लागत आहे. तसेच साउथ चित्रपटसृष्टीत या चित्रपटाला कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाचा सामना करावा लागत आहे.

 


हेही वाचा :http://‘तुमचाही मुसेवाला होणार’ सलमानसह सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी