Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मला तुझी दुसरी पत्नी बनव... उर्फीची शाहरुखकडे अजब मागणी

मला तुझी दुसरी पत्नी बनव… उर्फीची शाहरुखकडे अजब मागणी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’बुधवारी (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध केला जात होता. परंतु आता पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांसोबतच मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार देखील शाहरुखचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाबाबत उर्वी जावेदची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. शाहरुखचं कौतुक करता करता उर्फीने अजब मागणी केली आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय म्हणाली उर्फी जावेद?
शाहरुखचा पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याच्या मागणीवर उर्फीला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उर्फी म्हणाली की, “मला बॉयकॉट करा आणि शाहरुख खानला पाहा प्लीज,” त्यानंतर ती म्हणाली की, “आय लव्ह यू शाहरुख, मला तुझी दुसरी पत्नी बनवं.” उर्फीचा हा प्रस्ताव ऐकून अनेकजण तिची खिल्ली उडवू लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

- Advertisement -

दरम्यान, सध्या अनेकांना पठाण चित्रपटाची भुरळ पडली आहे. पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरत आहे. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.


हेही वाचा :

Video : पोळी लाटता लाटता ‘तिला’ सापडला जीवनाचा ‘सूर’

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -