घरमनोरंजन'२.०' चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ एकदा बघाच!

‘२.०’ चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ एकदा बघाच!

Subscribe

२.० चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या वेळी अक्षय कुमार आणि रजनीकांत एकाच चित्रपटात दिसणार आहेत. अक्षयकुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘२.०’ची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये आहे. या अॅक्शन पटाच्या टीझरनंतर या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा सिनेमातील लुक कसा तयार केला? हे या व्हिडिओमध्ये आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

‘२.०’ मध्ये अक्षय कुमार निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. या आधी अक्षय ‘खिलाडी कुमार’ म्हणून प्रेक्षकांसमोर आला होता. या चित्रपटातून तो पहिल्यांदाच खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अक्षय खलनायक म्हणून कसा दिसतो? याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला जात आहे. एखादी भूमिका चोख पार पाडण्यासाठी कलाकाराला किती मेहनत घ्यावी लागते? हे हा व्हिडिओ बघितल्यावर समजतं. त्याचप्रमाणे अक्षयच्या मेकअपवर घेतलेली मेहनतही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

‘२.०’ चित्रपटाच्या मेकिंगप्रमाणेच चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. अवघ्या काही तासांतच हा टीझर १ कोटीहून अधिक लोकांनी बघितला होता. त्यामुळे रजनीकांत-अक्षयच्या ‘२.०’ चित्रपटाची वाट आता प्रेक्षक बघत आहेत. आपल्या खिलाडी अक्षय कुमारला खलनायकाच्या भूमिकेत बघायला त्याचे चाहते आता उत्सुक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -