घरताज्या घडामोडीकरिनाच्या मोलकरणीला कोरोनाची लागण तर मलायका -आलिया निगेटीव्ह

करिनाच्या मोलकरणीला कोरोनाची लागण तर मलायका -आलिया निगेटीव्ह

Subscribe

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत एकूण १५-२० जण होते

बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. अभिनेत्री करिना कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आणि घरात काम करणाऱ्या स्टाफची RTPCR चाचणी करण्यात आली. यात करिनाच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करिनासोबत तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोराला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अमृताची बहिण मलायका अरोराची देखील कोरोना चाचणी करण्यात आली मात्र मलयाकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचे कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत एकूण १५-२० जण होते. त्यात फॅशन डिझायनर मनीष मलहोत्रा देखील होता. त्याच्याकडून मात्र अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मुंबई पोलिकेने मंगळवारी एकूण १०८ लोकांची RTPCR चाचणी केली आहे. त्यातील जवळपास ३७ हायरिस्क लोकांचा फॉलोअप पालिकेतून घेतला जात आहे.

- Advertisement -

कभी खुशी कभी गम या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने एक डिनर पार्टी आयोजित केली होती. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, याच रात्री बॉलिवूड सेलिब्रेटींच्या दोन पार्टी झाल्या होत्या. त्यातील करण जोहरच्या पार्टीला अभिनेत्री मलायका अरोरा,अरोरा,अर्जुन कपूर,महीप कपूर,सीमा खान,आलिया भट्ट उपस्थित होते. तर रिया कपूरच्या घरी झालेल्या क्रिसमस पार्टीत अभिनेत्री मलायका, अमृता, करिश्मा,करिना,मसाबा गुप्ता,पूनम दमानिया होते.

रिया कपूर आणि करण जोहर अशा दोघांच्या पार्ट्या त्या रात्री झाल्या होत्या मात्र करण जोहरची पार्टी सर्वात जास्त चर्चेत आली. कोरोनाचा विस्फोट हा करण जोहरच्या पार्टीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा खानला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. सीमा करिनाच्या संपर्कात आल्यानंतर करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाली असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संजय कपूर आणि मुलगी शनाया कपूर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -