घर मनोरंजन मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा झाला ब्रेकअप? सोशल मीडियावर चर्चा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा झाला ब्रेकअप? सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. हे दोघेही मागील 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघंही एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात. अशातच समोर आलेल्या बातमीनुसार या दोघांमध्ये सध्या काही ठिक सुरु नसल्याचं म्हटलं जात आहे.

मलायका आणि अर्जुन कपूरचा झाला ब्रेकअप?

लोगों ने पूछा, 'कहां है मलाइका अरोड़ा'

- Advertisement -

नेहमी मलायकासोबत वेकेशनसाठी जाणारा अर्जुन सध्या सोलो व्हेकेशनसाठी गेला आहे. यावेळचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये मलायका अरोरा न दिसल्याने लोकांनी पुन्हा एकदा त्यांचा ब्रेकअपची झाल्याची चर्चा करु लागले आहेत.

मलायका अरोराने बादशाह आणि औरीसोबत फोटोसाठी पोज दिलीएवढेच नाही तर मलायकाने देखील नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत नाईट पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी मलायका तिचा मुलगा अरहान खानला देखील सोबत घेऊन गेली होती. सध्या मलायकाचे नाईट पार्टीतील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायकाचे आणि अर्जुनचे फोटो पाहून सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

5 वर्षांपासून करतायत एकमेकांना डेट

- Advertisement -

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी मलायकाने अर्जुनसोबतचे नाते अधिकृत केले. अर्जुन आणि मलायकाच्या वयात 13 वर्षांचे अंतर असूनही त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे. दरम्यान, अर्जुन कपूर लवकरच ‘मेरी पटनी का रिमेक’मध्ये दिसणार आहे.


हेही वाचा : ‘टेरिटरी’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

- Advertisment -