arjun kapoor, malaika : अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप! अभिनेत्रीने स्वत:ला घेतले कोंडून

गेल्या वर्षीचं १ जानेवारीला मलायका अरोराने अर्जून कपूरसोबतचे नाते इन्स्टाग्रामवर जगजाहीर केले होते.

Malaika Arora- Arjun Kapoor BREAK UP After Almost 4 Years Of Dating
arjun kapoor and malaika : अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप! अभिनेत्रीने स्वत:ला घेतले कोंडून

बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि पावर फूल कपल म्हणून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे नाव घेतले जाते. दोघे नेहमीच त्यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला तेव्हापासून दोघं नेहमी एकत्र दिसतात. यात कधी कुटुंबियांसोबत खास पार्टी करताना तर कधी बर्थडे सेलिब्रेशन करताना दिसत असतात. इतकेच नाही तर न्यू ईअरपूर्वी देखील हे कपल हॉलिडे सेलिब्रेशनसाठी विदेशात गेले होते. याठिकाणचे काही रोमँटिक आणि बोल्ड फोटो त्यांना आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरही पोस्ट केले होते. अशातच आता अर्जुन कपूर आणि मलायकाचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांच्यातील प्रेमाचे नाते तोडले असून दोघं एकमेकांपासून दूर झाले आहेत. अर्जून आणि मलायकाच्या वयात खूप अंतर आहे. असे असतानाही अर्जून या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा. तसेच मलायकावर खूप प्रेम करतो असे म्हणत वयाची पर्वा मी करत नाही असे नेहमी सांगायचा. मात्र दोघांनी आता त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

यानंतर मलायकाने स्वत:ला घराच कोंडून घेतले असून जवळपास आठवड्यापासून ती घराबाहेर पडली नसल्याचे म्हटले जातेय. यामुळे ती पूर्णपणे आयसोलेशनमध्ये गेल्याचे बोलले जात आहे. अर्जूनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका खूप दु:खी झाली असून तिने स्वत:ला यातून सावरण्यासाठी काही काळ जगापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीचं १ जानेवारीला मलायका अरोराने अर्जून कपूरसोबतचे नाते इन्स्टाग्रामवर जगजाहीर केले होते.


Mumbai Special Pavbhaji: भयंकर अंडरवर्ल्ड क्राईम थ्रिलर ‘मुंबई स्पेशल पावभाजी’