घरताज्या घडामोडी..आणि वयाने ११ वर्ष मोठ्या असलेल्या मलाईकाच्या प्रेमात पडला अर्जुन

..आणि वयाने ११ वर्ष मोठ्या असलेल्या मलाईकाच्या प्रेमात पडला अर्जुन

Subscribe

बॉलीवूडमध्ये मलाईका आणि अर्जुन कपूर यांच्या स्पेशल बॉंडींगची चर्चा कायम होत असते. दोन्ही सेलिब्रिटी कपल असल्याने जगभरातील चाहते त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. दोघे सोशल मीडियावर सक्रिय असून एकमेकांसोबत घालवलेल्या क्वालिटी टाईम्सचे फोटोही शेअर करतात. अर्जुन ३६ वर्षांचा असून मलाईका त्याच्याहून ११ वर्षांनी मोठी आहे. आज मलाईका ४७ वर्षांची आहे. पण म्हणतात ना प्रेमात वय, रंग, रुप याला महत्व नसतं तर भावनांना असतं. असचं काहीस या दोघांच्याही बाबतीत आहे. पण आज जरी हे दोघे समाजासमोर बिनधास्तपणे आपल्यातील नात्याची कबुली देत असले तरी काही वर्षांपूर्वी मात्र दोघांनी आपलं नात गुलदस्त्यातच ठेवलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

त्याला कारणही तसंच होतं. मलाईकाच्या आधी अर्जुनचे अफेयर सलमान खानची बहिण अर्पिताबरोबर होते. अर्जुन आणि सलमान यांच्यात मैत्री होती. तसेच बॉलीवूडमध्ये टीकण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे सलमान अर्जुनला सल्लेही द्यायचा. एवढंच नाही तर अर्जुनला फिटनेसचे धडे गिरवायलाही सलमाननेच शिकवले. यामुळे अर्जुनचे सलमानच्या घरी येणे जाणे व्हायचे. यातूनच त्याची मैत्री अर्पिताबरोबर झाली. नंतर त्यांच्यात प्रेमही झाले. सलमानच्या घरातला अजुर्नचा वावर वाढला. यामुळे सलमानच्या कुटुंबातही तो लाडका झाला. अरबाजची पत्नी असलेल्या मलाईकाबरोबरही अर्जुनच्या गप्पा व्हायच्या. पण नंतर कुठल्याशा कारणावरून अर्पिताबरोबर त्याचा ब्रेकअप झाला. तर दुसरीकडे मलाईका आणि अरबाजच्या नात्यातही तणाव होताच. यादरम्यान, मलाईका व अर्जुन यांच्यात मैत्री झाली. दोघेही समदुखी होते. तसेच बोनी कपूर यांनी श्रीदेवीबरोबर दुसरे लग्न केल्यापासून अर्जुनचे वडिलाशी संबंध दुरावले होते.अर्पिताबरोबरच्या ब्रेकअपमुळे तो नैराश्यात गेला होता. यादरम्यान, मलाईकाने त्याला आधार दिला. तेव्हापासून अर्जुन मलाईकाच्या प्रेमात पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

यादरम्यान मलाईका व अरबाज यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने ती मुलासह दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला लागली. नंतर अर्जुनचेही तिच्या घरी येणेजाणे वाढले. त्यावेळी वयातील फरकामुळे दोघांना ट्रोल करण्यात आला. कधी कधी खालच्या स्तरावरच्या टीकेलाही दोघांना सामोरे जावे लागले. पण दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. उलट त्यांच्यातील नाते अधिक भक्कम झाले. आज दोघे लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहत असून मलाईकाच्या मुलाबरोबरही अर्जुनची चांगली ट्यूनिंग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -