Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटातील ‘आप जैसा कोई’ गाण्यात मलायका अरोराचा ग्लॅमरस...

‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटातील ‘आप जैसा कोई’ गाण्यात मलायका अरोराचा ग्लॅमरस तडका

Subscribe

मॉडेल आणि डान्सर मलायका अरोरा वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असते. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मलायका बॉलिवूडमधील एका आगामी चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ असून यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री रकुलप्रीत सिंह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दरम्यान, नुकतेच मलायकाचे हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे नाव ‘आप जैसा कोई’ असून यामध्ये मलायका जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्यामध्ये आयुष्मान देखील डान्स करताना दिसत आहेत. शिवाय 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील गाणं ‘आप जैसा कौई मेरी जिंदगी मे आए’ याचं गाण्याला ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ चित्रपटामध्ये रिक्रेएट करण्यात आलं आहे. या गाण्यातील मलायकाचा ग्लॅमरस तडका पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

- Advertisement -

या गाण्याव्यतिरिक्त मलायकाने ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘हाऊसफुल 2’ मधील ‘अनारकली डिस्को चली’ आणि शाहरुखच्या दिल से चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ यांसारख्या बऱ्याच आयटम साँग्समध्ये मलायकाने काम केले आहे.

- Advertisement -

‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’मध्ये अक्षय कुमार देखील झळकणार
या चित्रपटामध्ये अक्षय कुमार फक्त एका कॅमियो सीनसाठी असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि आयुष्मान एकत्र काम करताना दिसणार आहेत. अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’चे दिग्दर्शन आनंद एल राय हे करत असून या चित्रपटामध्ये जयदीप अहलावत देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपट 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

अक्षय कुमारसह ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -