मलायकाच्या योगा टिप्स

Malaika Arora

चित्रपटसृष्टीत नाव मिळवायचे म्हणजे भरपूर चित्रपट गाठीशी असायला हवेत, सतत मोठमोठ्या सोहळ्यात सहभागी असायला हवे असे काहीसे कलाकारांना वाटत असते, पण मलायका अरोरा या अभिनेत्रीने हा अंदाज फोल ठरवलेला आहे. दिल से या चित्रपटातील छय्या छय्या या एका गाण्यावर तिने जी काही लोकप्रियता मिळवली ती आजवर तिने टिकवलेली आहे. महिला मंडळांकडून प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावणे आले तर ती फिटनेसवर बोलणे पसंत करते.

यालाही अनेक कारणे आहेत. मलायकाचा हा आरोग्य मंत्र ऐकला जावा यासाठी परिसरातील महिलांना आयोजकांकडून निमंत्रित केले जाते. एकीकडे प्रात्यक्षिक तर दुसरीकडे प्रेक्षक म्हणून या महिलांशी सुसंवाद साधणे तिला सोपे जाते. अरबाजपासून वेगळे झाल्याची बोंबाबोंब आहे, त्यामुळे तिच्या रोजच्या वागणुकीत थोडा मोकळेपणा आलेला आहे. चर्चेत रहायचे, रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षणात टीप्स द्यायच्या आणि तीसरीकडे महिलांना योगाच्या माध्यमातून आरोग्यविषयक सल्ले देणे वाढलेले आहे.