घरमनोरंजनअभिनेत्रीच्या आईने 47व्या वर्षी दिला बाळाला जन्म, 23 वर्ष लहान बहिणीचे फोटो केले शेअर

अभिनेत्रीच्या आईने 47व्या वर्षी दिला बाळाला जन्म, 23 वर्ष लहान बहिणीचे फोटो केले शेअर

Subscribe

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आर्या पार्वतीची आईने वयाच्या 47 व्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रा आर्या वयाच्या 23 व्या वर्षी मोठी ताई झाली आहे. काही दिवसांपूर्वी आर्या पार्वतीने स्वतः तिच्या सोशल मीडियावरुन आईचे फोटो शेअर केले होते. शिवाय वयाच्या 23व्या वर्षी ती ताई बनण्यासाठी उत्सुक असल्याचं तिने म्हटलं होतं.

दरम्यान, नुकतीच आर्याने आर्या म्हणाली, जेव्हा मला कळालं की माझी 47 वर्षांची आई गरोदर आहे तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. यावर कसं व्यक्त व्हावं काहीच कळत नव्हतं. ही गोष्ट माझ्या विचारांच्या पलीकडची होती. मला लहानपणापासूनच एक बहीण हवी होती. पण माझा जन्म झाल्यानंतर आईच्या गर्भपिशवीमध्ये काही अडचणी झाल्यामुळे तिला पुन्हा आई होण्यास अडचणी येत होत्या. आई गरोदर असल्याचं मला आठव्या महिन्यात कळालं. त्यांना देखील ही गोष्ट सातव्या महिन्यात समजली. आई आणि बाबा एक दिवस मंदिरात गेले असताना आईला अचानक चक्कर आली. तेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर ती गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, त्यावेळी आई सात महिन्यांची गरोदर असूनही तिचं पोट दिसून येत नव्हतं.”

- Advertisement -

पुढे आर्या म्हणाली की, “मला लहानपणापासूनच एक बहीण हवी होती. जी आता मला मिळाली. मी माझ्या बहिणीच्या जन्माने खूप खूश आहे.” असं आर्याने सांगितलं.

 

- Advertisement -

हेही वाचा :

शाहरुखचं कौतुक करताच पाकिस्तानी खासदाराने केली माहिरा खानची खरडपट्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -