Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मल्याळी ज्येष्ठ अभिनेते पी बालचंद्रन याचं निधन

मल्याळी ज्येष्ठ अभिनेते पी बालचंद्रन याचं निधन

Related Story

- Advertisement -

मल्याळी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, पटकथा लेखक पी बालचंद्रन याचं आज निधन झालं. वयाच्या ६२व्या वर्षी पी बालचंद्रन यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. केरळच्या वैकोम येथे असलेल्या निवासस्थानी सकाळी जवळपास पाच वाजता पी बालचंद्रन यांची प्राणज्योत मावळली.

माहितीनुसार गेल्या आठ महिन्यांपासून बालचंद्रन यांच्या मेनिंजाइटिस या आजारावर अम्रित रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्यामुळे ते बऱ्याच काळापासून अंथरुणाला खिळून होते. बालचंद्रन यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. बालचंद्रन शेवटचे सुपरस्टार मामूट्टीचा चित्रपट ‘वन’मध्ये दिसले होते. गेल्या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

- Advertisement -

अभिनेते बालचंद्रन यांच्या पश्चात्य पती श्रीलता आणि दोन मुलं श्रीकांत आणि पार्वती आहेत. बालचंद्रन यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अभिनेता आणि निर्माता जयसूर्याने बालचंद्रन यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत करत त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. जयसूर्या व्यतिरिक्त अनेक मल्याळम कलाकारांनी बालचंद्रन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

पी. बालचंद्रन याचं पूर्ण नाव पद्मनाभन बालचंद्रन नायर असे आहे. त्यांच्या जन्म २ फेब्रुवारी १९५२मध्ये झाला होतो. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत पटकथा लेखन आणि अभिनेता म्हणून काम केलं आहे. ‘कम्मट्टी पाडम’, ‘त्रिवेन्द्रम लॉज’, ‘इवान मेघरुपन’, ‘पवित्रम’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दरम्यान बालचंद्रन यांना केरळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९८९चे नाटक ‘पावम उसमान’साठी केरळ प्रोफेशनल नाटक अवॉर्ड मिळाला होता.


- Advertisement -

हेही वाचा – अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ भूमी पेडणेकर आणि विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह


 

- Advertisement -