घरमनोरंजन'सुई - धागा'मधून भेटीला येणार 'ममता आणि मौजी'

‘सुई – धागा’मधून भेटीला येणार ‘ममता आणि मौजी’

Subscribe

वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या 'सुई - धागा' चित्रपटाची तारीख सोशल मीडियावरून घोषित करण्यात आली आहे.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट टीम कॅप्टन विराट कोहलीबरोबर लग्नबंधनात अडकल्यानंतर अनुष्का शर्मानं लगेचच ‘सुई धागा: मेड इन इंडिया’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच वरूण धवन आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसणार आहेत. आता ही हटके जोडी ‘ममता आणि मौजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. यावर्षी २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. वरूण धवन आणि अनुष्कानं आपला एक फोटो शेअर करत ही तारीख घोषित केली आहे. सोशल मीडियावरून दोघांनीही हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये वरूण आणि अनुष्का दोघेही एका वेगळ्याच अवतारात दिसत आहेत.

- Advertisement -

‘पटाखा’ चित्रपटाला देणार टक्कर

याच दिवशी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘पटाखा’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळं ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ आणि ‘पटाखा’ या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. ‘पटाखा’ मध्ये ‘दंगल’फेम सान्या मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर वरूण धवन आणि अनुष्का यांच्या ‘सुई धागा: मेड इन इंडिया’मध्ये महत्त्वाच्या आणि वेगळ्या भूमिका आहेत.

पहिल्यांदाच वरूण करणार टेलरची भूमिका

‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात पहिल्यांदाच वरूण धवन टेलरची भूमिका करणार आहे. आतापर्यंत वरूणनं विविध भूमिका केल्या आहेत. तर अनुष्कादेखील पहिल्यांदाच एका गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांनीही आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका केल्या होत्या. स्वदेशी वस्तूंवर नेहमीच आपल्या देशात जोर देण्यात आला आहे. याचसंदर्भात एका विशिष्ट अंदाजात हा चित्रपट भाष्य करणार असल्याचं वरूणनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -