घरमनोरंजनममता कुलकर्णी, मॉडेल,अभिनेत्री ते ड्रग रॅकेट

ममता कुलकर्णी, मॉडेल,अभिनेत्री ते ड्रग रॅकेट

Subscribe

२० एप्रिल १९७२ रोजी मतता कुलकर्णी हिचा जन्म मुंबईतील एका सामान्य परिवारात झाला. एकेदिवसी ममताच्या आईने वृत्तपत्रातील एक जाहिरात पाहिली आणि त्यात असे लिहिले होते की, मॉडलिंग एजेंसीसाठी एक नवा चेहरा शोधत आहेत. त्यावेळी मतता ही शाळेत होती. जेव्हा ती घरी आली तेव्हा आईने विचारले की, तुला मॉडलिंग करायची आहे का? तेव्हा तिने म्हटले पाहूयात. पुढे लगेच आईने ठिक आहे असे म्हणत तु तयार रहा आपण अॅड एजेंसीकडे जात असल्याचे म्हटले. ममताने त्या एजेंसीमध्ये गेली आणि त्यानंतर तिला सातत्याने मॉडलिंगसाठी ऑफर मिळू लागल्या होत्या.

मॉडलिंगग नंतर ममताला साउथ सिनेमांमध्ये काम मिळू लागले होते. तिचा पहिला सिनेमा ननबारगल (१९९१) होता. मेरा दिल तेरे लिए (१९९१) मध्ये ममता दिसून आली आणि सातत्याने पुढे तिला काही सिनेमे ही मिळाले. सुनील शेट्टी, अक्षय कुमार, सैफ अली खान, सनी देओल सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना तिच्याकडे काही सिनेमा होते. परंचु तिला कधीच टॉप एक्ट्रेसेसच्या लिस्टमध्ये स्थान मिळाले नव्हते. ममताच्या करियर मधील सर्वाधिक चर्चित सिनेमे आशिक आवारा (१९९३), करण अर्जुन (१९९५), सबसे बडा खिलाडी (१९९५), आंदोलन (१९९५), बाजी (१९९६), चाइना गेट (१९९८) होते.

- Advertisement -

हैदराबादमध्ये ममता कुलकर्णीचे मंदिर
१९९२ मध्ये ममता कुलकर्णी ही सिनेमा प्रेम शिकारम मध्ये दिसून आली होती. ज्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. साउथमध्ये ममताच्या चाहत्यांची संख्या तुफान वाढली गेली. त्यामुळेच हैदराबाद मध्ये तिचे मंदिर तयार केले गेले. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ममताला साउथ मधील चाहत्यांचे सुद्धा ईमेल यायचे. जेव्हा ममताला याबद्दल कळले तेव्हा तिने असे म्हटले की, मला याची अपेक्षाच नव्हती. जर मी तिथे गेली तर त्या मंदिरात जरुर जाईन.

मॅगजीन कवरवर टॉपलेस पोज दिल्याने चर्चेत

- Advertisement -


१९९३ मध्ये स्टारडस्ट मॅगझिनच्या कवर पेजवर ममताने टॉपलेस फोटोशूट केले होते. परंतु त्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात अडकली गेली होती. लहरे रेट्रोला दिलेल्या एका जुन्या व्हिडओत ममताने असे म्हटले होते की, मला माहितेय की, माझ्याकडून चूक झाली आहे. लोक मला साधीसरळ समजतात. जेव्हा माझ्याकडे चाहत्यांची पत्र येतात तेव्हा ते मला आदरणीय कुलकर्णी असे म्हणतात. पण माझा असा फोटो आल्याने मलाच धक्का बसला आहे. मला माहिती नव्हते याचे परिणाम असे असतील. लोक माझी देवीप्रमाणे पूजा करायचे. असे म्हटले जायचे की, त्यावेळी २० रुपयाची ही मॅगझिन १००-१०० रुपयाला विक्री केले जात होते.

स्पष्टीकरण दिले तेव्हा
स्पष्टीकरण देताना ममता हिने आपली बाजू सेफ करण्यासाठी काही दुसऱ्या अभिनेत्रींचे सुद्धा नाव घेतले. तिचे हे विधान पुन्हा चर्चेत आले होते. तिने असे म्हटले होते की, पूजा बेदी असो किंवा दुसरी कोणतीही अभिनेत्री त्या सुद्धा ही असचं करतात. तेव्हा लोक त्यांना काहीच म्हणत नाहीत. उलट म्हणतात ते त्यांचे काम आहे. परंतु जेव्हा ममताचे नाव घेतले गेले तेव्हा तिला धक्का बसला होता.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनमुळे मिळाला होता सिनेमा


सिनेमा घातकचे गाणे ‘मारा रे’ मध्ये ममताचा स्पेशल अपीयेरंस होता. या सिनेमाला राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. जेव्हा राजकुमार यांनी १९९९ मध्ये चाइना गेट सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्यामध्ये ममताला घेतले. राजकुमार या कास्टिंगमुळे आनंदित नव्हते आणि अभिनेत्री बदलण्याबद्दल विचार करत होते. जेव्हा राजकुमार यांनी तिला सिनेमातून काढले तेव्हा सातत्याने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे धमकीचे फोन येऊ लागले होते. छोटा राजनकडून धमक्या मिळाल्यानंतर राजकुमारने ममता हिला पुन्हा सिनेमात घेतले.

सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर तो पूर्णपणे फ्लॉप झाला. परंतु छम्मा-छम्मा गाण्यामुळे तो सिनेमा सर्वांच्या लक्षात राहिला. यामधून उर्मिला मातोंडकरला खुप प्रसिद्धी मिळाली. तर ममता लीड रोलमध्ये होती तरीही तिचे कौतुक केले गेले नाही.

कास्टिंग काउचचा खुलासा
सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर ममता कुलकर्णी हिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, राजकुमार संतोषी यांनी कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सांगितले होते. ममताने यासाठी नकार दिल्यानंतर तिचा बदला घेण्यासाठी सिनेमातील काही सिन कट केले. ममताने असा सुद्धा आरोप लावला की, राजकुमार यांच्या सांगण्यावरुनच तिला काही सिनेमांमधून काढून टाकले होते.

छोटा राजनशी नाते
एक वेळ अशी होती की, ममता कुलकर्णी आणि छोटा राजन यांच्या अफेअरच्या खुप चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु त्याबद्दल त्यांनी कधीच खुलेपणाने सांगितले नाही.पण ज्या प्रकारे छोटा राजन आपल्या धमक्यांच्या माध्यमातून ममताला सिनेमे मिळवून देत होता अशातच कळून येत होते की, त्यांच्यामध्ये काहीतरीआहे. परंतु जेव्हा तपास यंत्रणांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने देशातून पळ काढला तेव्हा या दोघांमध्ये दुरावा वाढू लागला. छोटा राजनच्या गैरउपस्थितीत विक्की गोस्वामी तिचे काम सांभाळत होता. अशातच ममता आणि विक्की यांचे नाव जोडले जात होते. छोटा राजन गेल्यानंतर ममताला सिनेमे मिळणे जवळजवळ बंद झाले. २००२ चा सिनेमा हम कभी तुम नंतर ममता कुलकर्णी अचानक सिनेमांपासून दूर झाली.

ग्लॅमर वर्ल्ड सोडून बनली साध्वी


फिल्म इंडस्ट्रीला रामराम केल्यानंतर विक्की गोस्वामी सोबत दुबईत आणि केन्या मध्ये जाऊन राहू लागली. त्यानंतर अचानक २०१३ मध्ये ममताचा एक फोटो समोर आला होता. त्यात ती साध्वीच्या रुपात दिसली. या वर्षानंतर ममता कुलकर्णीने बुक ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगिनी लॉन्च केली होती. याचे फोटो आणि बुकसह ममता पुन्हा चर्चेत आली. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने असे म्हटले होते की, मी विक्की सोबत लग्न केलेले नाही. ना आता मी कोणाचीही बायको आहे. काही लोक केवळ काम करण्यासाठी जन्म घेतात आणि काही देवासाठी. मी देवासाठी जन्म घेतला आहे. ममता पूर्णपणे साध्वी झाली आहे.

२००० कोटींच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमध्ये अडकली होती
२०१६ मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा रुमर्ड नवरा विक्की गोस्वामी यांचे नाव २००० कोटींच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये समोर आले होते. असा आरोप होता की, दोघे केन्यामध्ये एक मोठे ड्रग्ज रॅकेट चालवत आहे. नाव समोर आल्यानंतर दोघांचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती पण ते मिळालेच नाहीत. २०१६ मध्ये ठाण्यातील एका स्पेशल कोर्टाने दोघांना फरार म्हणून घोषित केले. २०१७ मध्ये ममता कुलकर्णी हिची मुंबईतील संपत्ती जप्त केली होती.

 


हेही वाचा: अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल; महिलेला धमकावणे आणि आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -