Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम 'या' मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी

‘या’ मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. अभिनेत्रीला धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यदला बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. शिवाय, तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी रविवारी अहमदनगर मधून एका २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. संदीप मच्छिंद्र वाघ असं आरोपीचं नाव आहे.

गेल्या वर्षीपासून आरोपी संदीप मच्छिंद्र वाघ हा दीपाली सय्यदला त्रास देत होता. दिपाली सय्यद ऑगस्ट २०१९ मध्ये अहमदनगरमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरुन झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी आरोपीने दीपाली सय्यदचा नंबर मिळवला. त्यानंतर तो विनाकारण कॉल आणि मॅसेज करायचा. यानंतर सय्यदने त्याला ब्लॉक केलं होतं. ४ ऑक्टोबरला त्याने पुन्हा कॉल करुन वाढदिवसाच्या पार्टीला येणार का? असं विचारलं. वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी एक लाख रुपये घेते असं दीपाली सय्यदने सांगितलं. यानंतर आरोपीने शिवीगाळ करायला सुरुवात केली.

- Advertisement -

दीपाली सय्यदने आरोपीला पोलिसांत तक्रार दाखल करेन असं बजावलं. त्यावर आरोपीने बलात्कार करण्याची आणि अहमदनगरमध्ये आली तर ठार मारेन, अशी धमकी दिली. यानंतर दीपाली सय्यदने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर आरोपीचा तपास करत अहमदनगरमधून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

- Advertisement -