घरताज्या घडामोडीकोणासारखं होऊ नका स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा

कोणासारखं होऊ नका स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा

Subscribe

अभिनेत्री हृता दुर्गुळेने माय महानगरशी मारलेल्या दिलखुलास गप्पा 

महाराष्ट्राची क्रश एक्सप्रेशन क्वीन असे अनेक किताब चाहत्यांकडून मिळालेली लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणजेच मन उडू उडू झालया मालिकेतील दिपीकाने माय महानगरशी मारलेल्या दिलखुलास गप्पा

  • तुझ्या मालिका क्षेत्रातील प्रवासा विषयी काय सांगशील?

या सगळ्याचं श्रेय प्रत्येक मालिकेच्या दिग्दर्शकाला जात. तिनही कॅरॅक्टर खूप सुंदर लिहिली गेली होती. मी खरंतर ती व्यक्तिरेखा म्हणून फक्त दिसते पण हे प्रत्येक पात्र उभं करण्यात लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा मोठा वाटा असतो. आजपर्यंत मला मंदार देवस्थळी, दीपक नलावडे यांसारखे चांगले दिग्दर्शक मिळाले.

- Advertisement -
  • अजिंक्य राऊत आणि तुझं ऑफस्क्रिन बॉडींग कसं आहे?

खरतर आम्ही या सिरीअलच्या निमित्ताने पहिल्यांदा लूक टेस्टला भेटलो. आता आम्हाला एकत्र काम करुन तीन महिने झाले कारण ऑगस्ट मध्ये आम्ही शूटिंगला सुरुवात केली. तो खूप खरा आणि प्रामाणिक आहे. मला कामा बद्दल खूप सिरिअस असणारी माणस खूप आवडतात. त्याला माहिती आहे त्याला आयुष्यात काय मिळवायचं करायच आहे. मी अस म्हणू शकते की तो माझा चांगला मित्र आहे.

  • मन उडू उडू झालया मालिकेतील दिपीका आणि हृता मध्ये काही साम्य आहे का?

मला अस वाटत एकच साम्य आहे ते म्हणजे चेहरा. दिपू जेवढी भित्री आहे तेवढी हृता नक्कीच नाहीये. जेवढी एखाद्या परिस्थिती मध्ये दिपू हलते तेवढी हृता नाही हलत. दिपू ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली ते मी अनुभवल नाहीये  आणि तिच ही भूमिका करण्यामागची खरी मज्जा आहे.

- Advertisement -
  • दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक तू साधारण दोन वर्षांनी पुन्हा सादर करतेय तर कसं वाटतय?

मी खूप आनंदी आहे कारण आमचा परवाचा प्रयोग हाऊसफुल झाला. लोक खूप छान प्रतिसाद देत आहेत. हे पाहून खूप बर वाटल. आता नाट्य सृष्टीला जास्त गरज आहे कारण माणस आली नाहीत तर आमचे प्रयोग होणार नाहीत.

  • या क्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्यांना तू काय सांगशील?

प्रत्येकाचा स्वत:चा एक प्रवास असतो. आपण घेतलेले निर्णय आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात.  त्यामुळे कोणासारख होऊ नका तर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा.  कधी कधी ट्रोलींगला सुद्धा सामोर जाव लागत. बाहेरून जितक सगळं छान दिसत तस सगळं असत अस नाही.


हेही वाचा – ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ची मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ने होणार सांगता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -