Hruta Durgule Boyfriend: इंद्रा नाही तर ‘या’ व्यक्तीवर जडलं ह्रताचं मन, दिली प्रेमाची कबुली

ह्रताने टेलिव्हिजन डिरेक्टर प्रतीक शाह याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबुल केले

man udu udu jhalaya actress hruta durgule announce her relationship with tv director prateek shah
इंद्रा नाही तर 'या' व्यक्तीवर जडलं ऋताचं मन

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी मन उडू उडू झालं मधील दिपू म्हणजे अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने तिच्या चाहत्यांना एक सप्राइज दिलय. जे पाहून ह्रताचे फॅन्स चकीत झाले आहेत. सध्या ह्रताची दीपू ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली आहे. तिची आणि इंद्राची जोडी सध्या महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे.  दीपू आणि इंद्राचे सुर आताकुठे जुळू लागलेत मात्र दीपू म्हणजेच ह्रताच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाचे सूर फार आधीच जुळून आलेत. त्या प्रेमाची कबुली देखील ह्रताने दिली. ह्रताने तिच्या खऱ्या आयुष्यातील इंद्राविषयीचा खुलासा केलाय. ह्रताने टेलिव्हिजन डिरेक्टर प्रतीक शाह याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबुल केले आहे. दोघांचा एक रोमँटीक फोटो शेअर ह्रताने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

ह्रताने प्रतीक आणि तिचा एक फोटो शेअर करत त्यावर तिच्या प्रेमाची कबुली दिलीय. आय फाइंड इन यू द होप आय हॅव नेव्हर नो! असे म्हटले आहे. ह्रताने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. ऋताने पिवळ्या रंगाचा कुर्ता तर प्रतीकने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.

ह्रताने दिलेल्या या खुशखबरीनंतर मराठी टेलिव्हिजनमधील अनेक कलाकारांनी ह्रताला शुभेच्छा दिल्या आहेत. रंग माझा वेगळा फेम आशुतोषने ह्रताचे अभिनंदन करत ‘अरे अरे अरे क्या बात है’ असे म्हटले आहे. तर अभिनेत्री प्रिया बापटने ‘जलवा’ म्हणत ह्रताच्या पोस्टवर कमेंट केली आहे. बिग बॉस फेम आदिश वैद्यने देखील ह्रताचं अभिनंदन करत ‘मला तुझ्या लग्नाच्या मंगलअष्टका ऐकू येतायत’ असं म्हटलंय. तर ह्रताने दिलेली ही खुशखबर ऐकून अभिनेत्री हर्षदा खानविलकरने ‘आपण लवकरच भेटू’ असं म्हटलय. एकंदरीत ह्रताने दिलेल्या बातमीनंतर सर्वांना आनंद झाला आहे.

आपण पाहिलं तर ह्रताने कधीच तिच्या सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कोणतीही पोस्ट किंवा कोणता व्हिडिओ शेअर केला नव्हता. ह्रताने आज अचानक दिलेल्या सप्राइजनंतर सगळेच शॉक झाले आहेत.

ह्रताने तिच्या खऱ्या आयुष्यातील इंद्राची बातमी सांगितल्या नंतर मात्र तिच्या चाहत्यांनी अभिनेता यशोमनला देखील प्रश्न केले आहे. काही मजेशीर प्रतिक्रीय देखील ह्रताच्या पोस्टखाली पहायला मिळत आहेत. ‘यशोमन आम्हाला वाटल होत तु अशील ह्रताचा लाईफ पार्टनर’, काही चाहत्यांनी तर ‘काय झालं?कधी झालं? कसं झाला? आणि मुळात का झालं?’, अशा प्रतिक्रीया देखील आल्या आहेत. एकंदरीतच काय तर ह्रताच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांच्या दिल के तुकडे तुकडे झाले आहे.

कोण आहे ह्रताचा होणारा नवरा प्रतीक शाह?

प्रतिक शाह हा हिंदी टेलिव्हिज क्षेत्रातील प्रसिद्ध डिरेक्टर आहे. हिंदी टेलिव्हिजवरील ‘तेरी मेरी इक जिंदडी’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग के प्यार ऐसे भी’, ‘एक दिवाना था’, ‘मनमोहिनी’ अशा अनेक मलिकांचे डिरेक्शन प्रतीकने केले आहे.


हेही वाचा – Preity Zinta Became Mother : गुड न्यूज, प्रिती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई