Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मानधन थकवल्याच्या आरोपानंतर मंदार देवस्थळींनी मागितली माफी

मानधन थकवल्याच्या आरोपानंतर मंदार देवस्थळींनी मागितली माफी

कलाकारांनी केले सोशल मिडियाद्वारे आरोप.

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पैसे बुडवल्याचा आरोप केला. या आरोपांबाबत शर्मिष्ठाने सोशल मिडियावर पोस्ट करुन जगजाहिर केले होते. गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करत आहे. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाही, आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्मात्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले,असे आरोप शर्मिष्ठाने केले. तिच्यासोबत अनेक कलाकारांनीही तिला पाठिंबा दिला. मात्र, मंदार देवस्थळी यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणं देऊन कलाकारांची माफी मागितली आहे.

मी खरंच वाईट माणूस नाही,असं म्हणत देवस्थळींनी मागितली माफी

मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे. कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलं आहे. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो, असं म्हणत मंदार देवस्थळी यांनी कलाकारांची माफी मागितली.

शर्मिष्ठाला ‘या’ कलाकारांचाही पाठींबा

- Advertisement -

शर्मिष्ठा राऊत कलर्स मराठीवर ‘हे मन बावरे’ मालिकेत काम करत होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांचे पैसे मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. आम्ही कलाकार कोणतंही चॅनल किंवा निर्माता असो नेहमीच आमच्याकडून चांगलं काम व्हावं, या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम केल्यावर योग्य मोबदला हाच हेतू असतो. पण काम करुनही वेळेवर मोबदला न मिळणे, योग्य आहे का? असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय निर्माता जगला तर कलाकार जगणार या तत्वावर जगतो अस म्हणत शर्मिष्ठाने निर्माता मंदार देवस्थळीला वेठीस धरले. तिच्यासोबत मालिकेतील मृणाल दुसानीस आणि विदिशा म्हसकर या कलाकारांचाही समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)


- Advertisement -

हेही वाचा – दहावी, बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन, परीक्षा केंद्रावर द्यावा लागणार पेपर

- Advertisement -