घरमनोरंजनमंदिरा बेदीने केलं 'बिकिनी वर्कआऊट'

मंदिरा बेदीने केलं ‘बिकिनी वर्कआऊट’

Subscribe

मंदिरा बेदी ही तिच्या हॉट फोटोशूट आणि वर्ककाउटच्या व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने तिचा बिकिनी वर्कआउटचा व्हिडिओ सोशलमीडियावर शेअर केला आहे.

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदी ही तिच्या अभिनयाबरोबरच फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत असते. मंदिरा ही झगमगत्या दुनियेपासून लांब असली तरी ती तिच्या ग्लॅमर फोटो आणि व्हिडिओतून प्रेक्षकांना भुरळ घातल असते. दोन मुलांची आई असतानाही तिने स्वत: ला खूप फिट ठेवले आहे. मंदिरा ही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या बोल्ड फोटोजसोबत तिचे वर्कआऊटचे व्हिडिओही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मंदिरा तिच्या दिनचर्येकडे बिलकुल दुर्लक्ष करत नाही. तिच्या वर्कआउटच्या व्हिडिओतून ती प्रत्येकवेळी इतरांना प्रेरणा देत असते. मंदिराने नुकताच तिच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ सोशलमीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून कोणी बोलणार पण नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही तिने स्वत:ची फिगर मेंटेन केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 व्हिडिओमध्ये मंदिरा बाथटबच्या समोर बिकिनीमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने बाथटब, बिकिनी आणि बॅंगिंग वर्कआउट – असे कॅप्शन दिले आहे. या वयातही मंदिराने उत्तम फिगर मेंन्टेन करताना दिसली आहे. तिच्या या व्हिडिओवर तिला काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिने अशीच एक वर्कआउटची व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली होती. काही वेळातच तो व्हायरल झाला होता. मंदिराच्या त्या व्हिडिओवर भरपूर जणांनी तिचे कौतुक केले होते. मंदिराने तिच्या प्रसुतीनंतर २२ किलो वजन कमी केले होते. यावरुनच ती तिच्या आरोग्यावर किती लक्ष देते हे समजते.

- Advertisement -

हे वाचा- बाबो…सेलिब्रिटी करतायत सोशल मिडियाला रामराम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -