Mandira Bedi: लग्नाच्या वाढदिवशी मंदिराला आली नवऱ्याची आठवण, शेअर केला लग्नाचा जुना फोटो

राज आज मंदिरासोबत नसला तरी त्यांच्या सुंदर आठवणी मंदिरासोबत आहेत. लग्नाचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन एकाच दिवशी येत असल्याने दोघांसाठी हा दिवस खास होता. आज राजच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मंदिरा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Mandira bedi emotional on the wedding anniversary, shared an old wedding photo with husband Raj
Mandira Bedi: लग्नाच्या वाढदिवशी मंदिराला आली नवऱ्याची आठवण, शेअर केला लग्नाचा जुना फोटो

अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण झालीत. १४ फेब्रुवारी १९९९ साली मंदिरा आणि राज यांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याची शपथ घेतली. मात्र मंदिराची साथ अर्ध्यात टाकून राज मंदिरापासून कायमचा दूर निघून गेला. लग्नाच्या २३व्या वाढदिवशी राज मंदिरासोबत नाही. राज आज मंदिरासोबत नसला तरी त्यांच्या सुंदर आठवणी मंदिरासोबत आहेत. लग्नाचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन एकाच दिवशी येत असल्याने दोघांसाठी हा दिवस खास होता. आज राजच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मंदिरा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मंदिराने सोशल मीडियावर एक पोस्ट करत राज आणि तिच्या लग्नातील नजर लागावा असा सुंदर फोटो शेअर केला. दोघेही लग्नाच्या जोड्यात फार सुंदर दिसत आहेत. ‘आज आपल्या लग्नाचा २३ वा वाढिदिवस #ValentinesDay’ असे प्रेमळ कॅप्शन देत मंदिराने दोघांचे लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने साडी नेसली आहे आणि राज तिच्या खांद्यावर डोके ठेवून फार गोड स्मॉइल करत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एक साथ उभे आहेत. दोघांचे सुंदर फोटो पाहून अनेकांनी कमेंटमध्ये ‘आज राज असता तर?’, ‘आज राज असायला हवा होता’, असे म्हटले आहे.

मागील वर्षी मंदिराचा पती राज कौशलचे अकाली निधन झाले. रात्री पार्टीहून आल्यानंतर अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने राजचा मृत्यू झाला. नशीबाच्या फेऱ्यातून कोणीही बाहेर येऊ शकत नाही. मंदिराने देखील हे जाणले आणि मोठ्या हिंम्मतीने ती दु:खातून सावरली.

मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा एक मुलगा आणि तारा नावाची एक मुलगी आहे. मुलगी ताराला राज आणि मंदिराने २०२०मध्ये दत्तक घेतले होते. राज गेल्यानंतर मंदिरा दोन्ही मुलांना वडिलांचे प्रेम देत आहे.


हेही वाचा –  रोहनप्रितने दिलं नेहा कक्करला खास Valentine सरप्राइज ! सगळ्यांसमोर नवऱ्याला केलं किस