Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन मंदिरा बेदीला सतावतेय पती राज कौशलची आठवण, मध्यरात्री शेअर केली भावनिक पोस्ट

मंदिरा बेदीला सतावतेय पती राज कौशलची आठवण, मध्यरात्री शेअर केली भावनिक पोस्ट

मंदिरा अद्याप राजच्या निधनामुळे स्वत:ला सावरु शकली नाहिये

Related Story

- Advertisement -

आपल्या आयुष्यातील महत्वपुर्ण व्यक्तीच्या आकस्मित निधनाने प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला पुन्हा सावरणे कठिण होते. अशातच काही दिवसांपुर्वी अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं नीधन झाल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंदिरा राजच्या आठवणीने पुरती बेहाल झाल‌्याचे दिसतेय. मंदिरा अद्याप राजच्या निधनामुळे स्वत:ला सावरु शकली नाहिये हे तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरुन दिसतेय. मंदिराने सोशल मीडिया अकांऊटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास पति राज कौशलच्या आठणीत इंस्टाग्राम अकाउंटवर राजी असं नाव लिहलेला एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच फोटच्या कॅप्शनमध्ये ‘मिस यू राजी…’ लिहतं हार्ट ब्रेकचा एमोजी दिला आहे. मंदिराच्या या पोस्टवरुन तिला सतत राजची आठवण येत असल्याचे जाणवतेय.(Mandira Bedi remembers her husband Raj Kaushal, an emotional post shared at midnight)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

- Advertisement -

राज आणि मंदिरा हे बॉलीवूडमधलं हॅपी कपल म्हणून ओळखले जातात. मंदिरा आणि राज हे पती पत्नी जरी असले तरी त्यांच्यातील मैत्रीचं नातंही अनोखं होतं. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांनी 1999 लग्नगाठ बांघली होती. तसेच 2011 साली मुलाला जन्म दिला होता तसेच नुकतच त्यांनी एका मुलीला दत्तक देखील घेतलं होतं. अभिनेत्री मंदिरा बेदीचा ती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं ३० जून रोजी पहाटे ४.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. राज यांच्या निधनामुळे मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच बॉलिवूड आणि टेलिव्हिजनसृष्टीतून दु:ख व्यक्त केलं जातंय. पतीच्या निधनानंतर मंदिराने काहि दिवसांपुर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवरून दु:ख व्यक्त करत तिचा प्रोफाईल फोटो हटवत  डीपीला ब्लॅक मार्क केलं आहे.हे हि वाचा – अभिनेत्री किम शर्मा करतेय टेनिस प्लेयर लिएंडर पेसला डेट,गोवामधील रोमँटिक फोटो झाले व्हायरल- Advertisement -

 

- Advertisement -