मंदिराने पतीच्या पार्थिवाला खांदा दिल्याने ट्रोल, सोना मोहपात्राने ट्रोलर्सला सुनावले

रुग्णालयात नेत असताना राज कौशलचं निधन

mandira bedi troll due to given a shoulder by husband Parthiwa Sona Mohapatra slams troller
मंदिराने पतीच्या पार्थिवाला खांदा दिल्याने ट्रोल, सोना मोहपात्राने ट्रोलसर्ला सुनावले

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशल याचे वयाच्या ४९ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. राज कौशल याच्या निधनामुळे मंदिरा बेदीला मानसिक धक्का बसला आहे. मंदिरा बेदीनं रुढी परंपरांना छेद देत परीच्या अंत्यसंस्काराच्या सर्व विधी स्वतः पार पाडल्या तसेच मंदिराने पतीच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. मंदिरा बेदीनं पार्थिवाला खांदा दिल्यानं काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मंदिराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेकांनी मंदिराचे समर्थन केलं आहे. गायिका सोना मोहपात्राने मंदिराच्या समर्थनात ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मंदिरा बेदीने पतीच्या पार्थिवाला खांदा दिला तसेच पतीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना मंदिराने सफेद टी-शर्ट आणि जीन्स असा पेहराव केला होता. यामुळे काही ट्रोलर्सने तिच्या कपड्यांवरुन निशाणा साधला होता. यावर सोना मोहपात्राने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. सोना मोहपात्राने म्हटलं आहे की, काही लोक मंदिरा बेदीला तिचा पती राज कौशल याच्या अंत्यसंस्कारावेळी घातलेल्या कपड्यांवरुन ट्रोल करत आहेत. आपल्या देशात मुर्खता इतर गोष्टींपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या गोष्टीचे जास्त अश्चर्य वाटत नाही. असे ट्विट सोना मोहपात्राने केलं आहे. सोनाने दिलेल्या उत्तरावर अनेक नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहीजणांनी सोनावर निशाणा साधला आहे. मंदिराने घेतलेल्या निर्णयला अनेक कलाकरांनी समर्थन दिलं आहे.

रुग्णालयात नेत असताना राज कौशलचं निधन

दिग्दर्शक राज कौशल याला सायंकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्याला अॅसिडिटी असल्यासारखे वाटल्याने गोळी घेतली होती. परंतु जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे मंदिराने त्याला लिलावती रुग्णालयात नेण्याचे ठरवले. मंदिरा बेदीने मित्राच्या मदतीने राज कौशला रुग्णालयात नेण्यासाठी रवाना झाले. रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना राज कौशलला अधिक अस्वस्थ वाटू लागले आणि हळू हळू प्रतिसाद देणे बंद केलं. रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्यामुळे गाडीतच राज कौशल याचा मृत्यू झाला होता. गाडीत पल्स चेक केली असता मंदावली असल्याचे आढळले होते. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी राज कौशल याला मृत घोषिक केलं. राज कौशल याला वयाच्या ४९ व्या वर्षी प्रथमच ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.