Amruta Fadnavis: अखेर अमृता फडणवीसांनी जाहीर केलेले तुफानी गाणं प्रदर्शित

लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना शानदार गिफ्ट दिले

manike mage hithe hindi version by amruta fadnavis new song release
Amruta Fadnavis: अखेर अमृता फडणवीसांनी जाहीर केलेले तुफानी गाणं प्रदर्शित

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कालच अमृता फडणवीस यांनी ‘आओ कुछ तुफानी करते है’ असे सुचक ट्विट केले होते. अमृता फडणवीसांच्या ट्विटनंतर आज संध्याकाळी काही तरी नवीन पहायला मिळणार हे निश्चित होते आणि आज संध्याकाळीच अमृता फडणवीसांचं ते तुफानी गाणं प्रदर्शित झाले आहे. अमृता फडणवीसांच्या फेसबुक वॉलवरुन त्यांचे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना शानदार गिफ्ट दिले आहे. गाण प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

‘सध्याच्या तापलेल्या राजकीय घडामोडींमध्ये या कूल गाण्याचा आस्वाद घ्या’, असं म्हणत अमृता फडणवीसांनी हे गाणे शेअर केले आहे. तसेच लग्नाच्या वाढदिवसासाठीचे हे स्पेशल गाणे असल्याचे देखील अमृता यांनी नमूद केले आहे. अमृता यांनी त्यांच हे नवे तुफानी गाणे श्रीलंकन गायिका योहानी हिच्या मनिके मागे हिते या गाण्यावर प्रेरित होऊन गायले आहे. मनिके मागे हिते गाण्याचे हे हिंदी वर्जन असल्याचे अमृता फडणवीसांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमृता फडणवीसांनी काल केलेले सूचक ट्विट

अमृता फडणवीसांच्या आतापर्यंच्या सर्व गाण्यातील हे गाणे अतिशय वेगळे ठरले आहे. मागील गाण्यांमध्ये आणि या नव्या गाण्यात मोठा फरक दिसून येतोय. अमृता फडणवीस स्टायलिश,ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहेत. अमृता फडणवीसांचे गायन कौशल्य सर्वांनाच माहिती आहे. त्यांची या आधीही प्रदर्शित झालेली सर्व गाणी हिट ठरली आहे.  गणोशोत्सावानिमित्त गणेश वंदना अमृता फडणवीसांनी गायली होती.

नुकतेच दिवाळीत अमृता फडणवीसांनी जय लक्ष्मी माता ही महालक्ष्मीची आरती गायली होती. गायक सोनू निगम सोबत अमृता फडणवीसांनी हे गाणे गायले होते. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


हेही वाचा – पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोरगं मजेतय’